जेष्ठ नागरिक महासंघाचे तालुकाध्यक्ष सुधाकरराव लोहारे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
चाकूर : 11 एप्रिल
येथील प्रतिष्ठित व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ नागरिक संघाचे चाकूर तालुकाध्यक्ष सुधाकरराव लोहारे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
आज गुरुवार दि.11 एप्रिल 2024 रोजी भल्या पहाटे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने उपचारासाठी लातूरकडे घेऊन जात असताना वाटेतच लोहारे यांचे निधन झाले. मृत्यू समयी ते 70 वर्षाचे होते.त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळीसह व्यापारी, वकील, डॉक्टर्स व नातेवाईक मोठया संख्येने उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या या अकाली निधनाबद्दल सर्वत्र हळहळ केली जात आहे.लोहारे हे चाकूर रोटरी क्लबचे माजी अध्यक्षही होते.