आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते 8 कोटी दोन लाख रुपयाच्या कामांचे भूमिपूजन

मतदार संघाच्या विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नाही - आ. बाबासाहेब पाटील यांची ग्वाही

चाकूर : 8 मार्च / मधुकर कांबळे
विविध विकास योजने अंतर्गत चाकूर तालुक्यातील कलकोटी येथे 8 कोटी दोन लक्ष रुपयांच्या डांबरीकरण, सिमेंट रस्ता व पुलाच्या कामांचे भूमिपूजन चाकूर अहमदपूर तालुक्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यामध्ये 5 कोटी रुपयाचे कलकोटी ते अजनसोंडा (बु) रस्त्याचे सिमेंटीकरण व डांबरीकरण, 2 कोटी 72 लाख रुपयाच्या कलकोटी ते अजनसोंडा (बु) रस्त्यावरील पुलाचे बांधकाम , मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत 20 लाख रुपये व सामाजिक न्याय विभाग अंतर्गत दहा लाख रुपयांच्या सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन अशा एकूण 8 कोटी दोन लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य पद्माकरराव पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगर पंचायतचे गटनेते करीमसाहेब गुळवे, राष्ट्रवादी काँग्रेस जेष्ठ नेते बालाजी सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य दयानंद सुरवसे, नगर पंचायतचे बांधकाम सभापती मिलींद महालिंगे, माजी पंचायत समिती सदस्य शिवाजीराव माने, सरपंच परमेश्वर कांबळे,नगरसेवक मुज्जमील सय्यद,माजी नगरसेवक इलियास सय्यद ,राष्ट्रवादी सेवादलाचे तालुकाध्यक्ष शिवदर्शन स्वामी, रामभाऊ कसबे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण तिकटे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शरद निकम, कंत्राटदार बिक्कड, राष्ट्रवादीचे चाकूर शहराध्यक्ष शिवशंकर हाळे, सरपंच अंतेश्वर माने, सरपंच देवीदास माने, सरपंच हणमंत नरवटे, सरपंच वैजनाथ पाटील, दासराव पाटील, अनिल वाडकर, माजी चेअरमन सिद्धाजी माने,सुरज पटणे,सामाजिक न्याय विभाग जिल्हा कार्याध्यक्ष विष्णु तिकटे, सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ येडके, प्रा. विश्वनाथ घाटकार , डी.जी. भुरकापल्ले ,नवनाथ आवाळे, मारुती माडगे, रामकिसन चिंचोले,धारबा पाटील, शशिकांत भोसले,बिलाल पठाण, संगमेश्वर कसबे, अनिसभाई पठाण, शैलेश लवटे, आशताप पठाण, पवन बिरकळे, अजीत शेख,समाधान जाधव,सुरज घुमे, शकील गुळवे, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष आदित्य लवटे,सचिन तोरे,चंद्रमणी सिरसाठ, नारायण काचे, बापूसाहेब पाटील, हणमंत भोसले,अमोल जम्पनगिरे,ओमेश कसबे, रहीम शेख, धारबा पाटील, बालाजी पाटील तळेगावकर, पंडित पवार, संजय मुगळे, विकास सावरगावे,योगीराज स्वामी, पवन सांगवे, विजयकुमार बिराजदार, दशरथ वागलगावेआदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात पुढे बोलताना आ. पाटील म्हणाले की मतदारसंघात विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून विकासकामे करण्यात आली. त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून अनेक लोकोपयोगी कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मी आमदारकी खऱ्या अर्थाने कामाला लावली आहे. येणाऱ्या काळातही या भागातील मुलभूत गरजा पुर्ण करून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून मतदार संघाच्या विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आ. बाबासाहेब पाटील यांनी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणपत नितळे यांनी केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन बिलाल पठाण यांनी केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास आ. पाटील यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच संयोजन समितीच्या वतीने आ. पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणपत नितळे, सूर्यकांत मिसे,सोपान नितळे, नामदेव नितळे, प्रभाकर जहागीरदार, मारोती हेमनर, चंद्रकांत नेवाळे, व्यंकटराव हाके, बाबूराव मदनुरे, नीलकांत मुद्रासे, चंद्रकांत नेवाळे, राहुल गायकवाड, श्रावण कांबळे, राजकुमार शेवाळे, लखन नेवाळे, लक्ष्मण कांबळे, मन्मथ वाडकर, अण्णा जहागीरदार, बालाजी हेमनर, सतिष जहागीरदार, त्र्यंबक पाटील, शंकर मोकाशे, विष्णू खेरडे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी कलकोटी व परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व गावातील नागरिक महिला पुरुष मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??