चाकूर पोलीस ठाण्याच्यावतीने सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त एकता दौड.

चाकूर : 31 ऑक्टोबर (मधुकर कांबळे )
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त चाकूर पोलीस ठाण्याच्यावतीने शहरात एकता दौडचे ( रन फॉर युनिटी )आयोजन करण्यात आले होते.

सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन देशभरात राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने लातूर जिल्हा पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली चाकूर पोलीस ठाण्याच्यावतीने आज शुक्रवार दि.31ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजता चाकूर शहरातील मुख्य रस्त्यावरून एकता दौड काढण्यात आली.
‘रन फॉर युनिटी’ एकता दौडमध्ये पोलीस अधिकारी,कर्मचारी,पत्रकार व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.पोलीस ठाण्यापासून सुरू झालेली ही एकता दौड मस्जिद चौक,सोसायटी चौक,जुने बसस्थानक,बोथी चौक,नवीन बसस्थानक,त्रिमूर्ती चौक,छत्रपती शाहू महाराज चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने परत पोलीस ठाणे अशी काढण्यात आली त्यानंतर ठाण्याच्या मुख्य प्रांगणात या एकता दौडचा समारोप करण्यात आला.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर यांनी विद्यार्थ्यांशी सवांद साधत मार्गदर्शन केले. तसेच पोलीस ठाण्याच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरणपूरक संदेश देण्यात आला.

या दौडमध्ये चाकूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर, पोलीस निरीक्षक बालाजी भंडे,पोलीस उपनिरीक्षक पंकज निळकंठे,पोलीस उपनिरीक्षक नूरजहाँ हाशमी पोलीस उपनिरीक्षक अच्युत सूर्यवंशी,पत्रकार अ.ना.शिंदे,प्रशांत शेटे,सुधाकर हेमनर,संग्राम वाघमारे,दत्तात्रय बेंबडे,संजय पाटील,दीपक पाटील,मधुकर कांबळे,जयहिंद अकॅडमीचे संचालक चंद्रकांत कसबे,पोलीस हेड कॉन्स्टेबल गोविंद बोळंगे,योगेश मरपल्ले, सुनील घोडके,रवी वाघमारे,श्रीमंत आरदवाड,हनमंत मस्के,रवी पेदेवाड,कृष्णा धडे, महिला पोलीस उषा कोटे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.


