सिटी प्रेस क्लब चाकूरचे पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कार जाहीर
जेष्ठ पत्रकार संजय जेवरीकर,काशीबाई थोरात,अभय मिरजकर आणि नागनाथ पाटील यंदाच्या पुरस्काराचे मानकरी

चाकूर :3 जानेवारी (मधुकर कांबळे )
येथील सिटी प्रेस क्लब चाकूरच्यावतीने पत्रकारिता क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या पत्रकारांसाठी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली असून उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार संजय जेवरीकर,पत्रकार भूषण पुरस्कार काशीबाई थोरात,मायदादा वृतरत्न पुरस्कार अभय मिरजकर आणि चाकूर भूषण पत्रकारिता पुरस्कार नागनाथ पाटील यांना देण्यात येणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे.
सदरील पुरस्कारांचे वितरण सोमवार दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी एका भव्य कार्यक्रमात राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते व अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत चाकूर येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयाच्या सभागृहात केले जाणार असल्याची माहिती सिटी प्रेस क्लब चाकूरचे अध्यक्ष प्रा.अ. ना. शिंदे व सचिव मधुकर कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
सिटी प्रेस क्लब चाकूरच्यावतीने गेल्यावर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार दिले जात आहेत. गेल्या वर्षी दैनिक एकमतचे संपादक मंगेश डोंग्रजकर, टाईम्स नाऊ मराठीचे जिल्हा प्रतिनिधी शशिकांत घोणसे पाटील, दैनिक मराठवाडा केसरी सह अनेक दैनिकांचे समुह संपादक नरसिंह घोणे व दैनिक गावकरीचे जिल्हा प्रतिनिधी संजीव पाटील यांना देण्यात आले होते.
यावर्षीच्या पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ पत्रकार संजय जेवरीकर, वरिष्ठ सहाय्यक संचालक माहिती व जनसंपर्क संचालनालय मुंबई -काशीबाई थोरात,दैनिक सामनाचे जिल्हा प्रतिनिधी अभय मिरजकर आणि नागनाथ पाटील आहेत.
स्व.नागोराव संभाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ पत्रकार अ. ना.शिंदे यांच्यावतीने ‘मराठवाडा स्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार’ जेष्ठ पत्रकार संजय जेवरीकर यांना दिला जाणार आहे.कालवश मालनबाई सोपानराव कांबळे व कालवश सोपान काशीराम कांबळे यांच्या स्मरणार्थ पत्रकार मधुकर कांबळे यांच्या वतीने ‘मराठवाडा स्तरीय मायदादा वृत्तरत्न पुरस्कार’ दैनिक सामनाचे जिल्हा प्रतिनिधी अभय मिरजकर यांना दिला जाणार आहे.स्व.काशीबाई बळीराम सोनटक्के यांच्या स्मरणार्थ जेष्ठ स्वातंत्र सैनिक बळीरामजी सोनटक्के व पत्रकार संगमेश्वर जनगावे यांच्या वतीने ‘मराठवाडा स्तरीय पत्रकार भूषण पुरस्कार’ वरिष्ठ सहाय्यक संचालक माहिती व जनसंपर्क संचालनालय मुंबई -काशीबाई थोरात यांना तर चाकूर येथील जेष्ठ पत्रकार नागनाथ पाटील यांना ‘चाकूर भूषण पत्रकारिता पुरस्कार’दिला जाणार आहे.



