आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पत्रकार संघाच्या निवडणुकीत वाघमारे,पाटील विजयी, सहकारमंत्री ना. पाटील यांनी केला सत्कार

चाकूर : 28 डिसेंबर ( मधुकर कांबळे )
चाकूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या झालेल्या चुरशीच्या निवडणूकीत अध्यक्षपदी संग्राम वाघमारे तर सचिवपदी संजय पाटील हे विजयी झाले असून राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी वाघमारे व पाटील यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
चाकूर येथील शासकीय विश्रामगृहात गुरुवार दि.25 डिसेंबर रोजी अध्यक्ष व सचिव पदासाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी 4 आणि सचिव पदासाठी 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये अध्यक्षपदासाठीचे उमेदवार संग्राम वाघमारे यांनी सर्वाधिक 24 मते घेऊन तर सचिवपदासाठी संजय पाटील यांना 19 मते घेत विजय मिळविला .पहिल्यांदाच प्रत्यक्ष मतदान पद्धतीने निवडणूक घेण्यात आली. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विनोद नीला, सुधाकर हेमनर व संगमेश्वर जनगावे यांनी काम पाहिले.
यावेळी पत्रकार संघांचे संस्थापक प्रशांत शेटे,माजी अध्यक्ष माधव वाघ, माधव तरगुडे,शिवशंकर टाक,सदाशिव मोरे,राजकुमार जगताप, अशोक बिराजदार, साखराप्पा वाघमारे, दयानंद सूर्यवंशी, दत्ता मेहकरे, बापूराव माने,उद्धव दुवे,सुशील वाघमारे,विकास स्वामी, दत्तात्रय बेंबडे, सतीश गाडेकर, किशन वडारे, पांडुरंग साळुंके, युसूफ शेख, गणेश स्वामी, चेतन होळदांडगे, बसवेश्वर जनगावे,दीपक पाटील, सुनील जाधव, नवनाथ डिगोळे,रियाज मणियार,गजानन चेऊलवार, बालाजी काटमपल्ले,देविदास हेमनर आदिजण उपस्थित होते.विजयी अध्यक्ष व सचिव यांचा सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी सत्कार केला. तसेच विविध स्तरातून वाघमारे व पाटील यांचे अभिनंदन होत आहे.

हा विजय माझा वैयक्तिक नसून संपूर्ण पत्रकार बांधवांचा विश्वासाचा विजय आहे.संघटनेला विचाराधिष्ठित, संघर्षशील आणि सर्वसमावेशक व्यासपीठ देण्यासाठी माझा प्रयत्न राहणार असून पत्रकारांच्या प्रश्नांसाठी प्रशासनाशी ठामपणे संवाद साधत न्याय मिळवून देण्यासाठी संघ नेहमीच अग्रभागी राहील, पत्रकारांमधील एकोपा वाढवून संघाला नव्या उंचीवर नेण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार.
—————
संग्राम वाघमारे
नूतन अध्यक्ष, पत्रकार संघ चाकूर
====================
पत्रकार संघाचे कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक व शिस्तबद्ध ठेवत संघटन बळकटीकरणावर भर देणार .
—————
संजय पाटील
नूतन सचिव , पत्रकार संघ चाकूर
=====================

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??