आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने संपूर्ण देश एका आदर्श लोकनेतृत्वाला मुकला– सहकार मंत्री ना. पाटील

चाकूर : 29 डिसेंबर (मधुकर कांबळे )
चाकूरचे सुपुत्र, लोकनेते शिवराज पाटील चाकूरकर हे एक स्थितप्रज्ञ नेतृत्व होते .त्यांच्या जाण्याने चाकूरसह संपूर्ण देश एका आदर्श लोकनेतृत्वाला मुकला असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री ना .बाबासाहेब पाटील यांनी चाकूर येथे केले.
चाकूर येथे समस्त चाकूरकरांच्यावतीने लोकनेते स्व.शिवराज पाटील चाकूरकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रविवार दि.28 डिसेंबर रोजी सोसायटीच्या प्रांगणात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना ना. पाटील म्हणाले की माणसाची किंमत जिवंत असताना आपल्याला नसते तर ती माणूस गेल्यावर कळते. चाकूरकरांनी राज्यात व देशात विविध पदावर काम केले असून त्यांची काम करण्याची वेगळीच हातोटी होती. त्यांनी विविध क्षेत्रात काम केले. चाकूरची विविध प्रशासकीय कार्यालय एकत्रित असावी अशी त्यांची भूमिका होती. त्यांच्या नेतृत्वात माझे चुलते माजीमंत्री बाळासाहेब जाधव व मलाही काम करता आलं हे आमचे भाग्य आहे . विविध भाषांचे ज्ञान व त्याचबरोबर अध्यात्मावर त्यांचा मोठा पगडा होता. असा सर्वज्ञानी माणूस पुन्हा होणे नाही.असे सांगून येणाऱ्या पिढीला त्यांच्या कार्याची ओळख व माहिती होण्यासाठी त्यांचा पूर्णकृती पुतळा विधानभवना समोर उभा राहिला पाहिजे असे ते म्हणाले.त्यांचे आचार विचार जर आत्मसात करून आपण राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली वाहिल्यासारखी होईल अशा भावना राज्याचे सहकार मंत्री नामदार पाटील यांनी व्यक्त केल्या.
यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा ,भाजपाचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरूमकर, माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील , माजी आमदार बब्रुवान खंदाडे,प्रा. बी. व्ही. मोतीपवळे, ॲड.संभाजीराव पाटील,गणेश हाक्के,नगराध्यक्ष करीम गुळवे,माजी नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे, सर्वोत्तमराव कुलकर्णी, विठ्ठलराव माकणे, विलासराव पाटील चाकूरकर यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी स्व.शिवराज पाटील चाकूरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण मान्यवरांनी पुष्पांजली वाहिली.या श्रद्धांजली सभेस चाकूरकर परिवारातील शैलेश पाटील चाकूरकर, नरेश पाटील चाकूरकर, विलासराव पाटील चाकूरकर, मोहनराव पाटील चाकूरकर, रुद्राली पाटील चाकूरकर, ऋषिका पाटील चाकूरकर उपस्थित होते.
प्रास्ताविक बालाजी पाटील चाकूरकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.राजेश तगडपल्लेवार व प्रमोद हुडगे यांनी केले. कार्यक्रमास चाकूर शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??