आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट वाटपाचा उपक्रम स्तुत्य आणि कौतुकस्पद – सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील

- चाकूर : 7 जानेवारी (मधुकर कांबळे )
बातमी संकलन करण्यासाठी पत्रकारांना इतरत्र सतत फिरावे लागते. त्यामुळे होणाऱ्या धावपळीत त्यांची सुरक्षितता महत्वाची असते. त्यासाठी पत्रकारांची सुरक्षितता लक्षात घेऊन चाकूर येथील पत्रकार संघ आणि व्हॉइस ऑफ मीडियाच्यावतीने घेण्यात आलेला हेल्मेट वाटपाचा उपक्रम हा निश्चितच स्तुत्य आणि कौतुकस्पद असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी केले.
चाकूर तालुका पत्रकार संघ व व्हॉइस ऑफ मीडियाच्यावतीने दर्पण दिनानिमित्त पत्रकारांना ना. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते हेल्मेट वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी ना. पाटील बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून विभागीय माहिती सहाय्यक संचालक डॉ. श्याम टरके उपस्थित होते तर गटविकास अधिकारी संतोष वंगवाडे , जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंह घोणे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड.धनंजय कोरे,नगरसेविका ज्योती स्वामी,प्रहारचे तालुकाध्यक्ष वर्धमान कांबळे,प्राचार्य डॉ. संतोष कांबळे,विशाल जाधव,प्रा.डॉ .भालचंद चाटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विवेक होळे ,विष्णू तिकटे,निलेश मद्रेवार, पपन कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना ना.पाटील म्हणाले की,पत्रकारिता ही समाजाला न्याय देण्यासाठी असते. पत्रकार हा समाजाचा आरसा असून पत्रकाराच्या माध्यमातून समाजाचे प्रतिबिंब उमटत असते.पत्रकार हा प्रशासन व लोकप्रतिनिधी मधला दुवा असतो त्यांच्यामुळेच राजकारणी लोकांना काम करण्यास अधिक सोयीस्कर होते असेही ना . पाटील म्हणाले. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंह घोणे,नगरसेविका ज्योती स्वामी,व्हॉइस मीडियाचे तालुकाध्यक्ष विनोद निला, डॉ. भालचंद्र चाटे यांचे समोचित भाषणे झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष संग्राम वाघमारे यांनी केले, सूत्रसंचालन प्रशांत शेटे व गणेश स्वामी यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन ना. पाटील व उपस्थित मान्यवारांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार संघाचे सचिव संजय पाटील, संगमेश्वर जनगावे, माधव वाघ, माधव तरगुडे, शिवशंकर टाक, सदाशिव मोरे, राजकुमार जगताप, अशोक बिराजदार,सुधाकर हेमनर,साखराप्पा वाघमारे, दयानंद सूर्यवंशी, दत्ता मेहकरे, सुशील वाघमारे, विकास स्वामी, दतात्रय बेंबडे, सतीश गाडेकर,किशन वडारे, पांडुरंग साळुंके, युसूफ शेख, , चेतन होळदांडगे, बसवेश्वर जनगावे, दीपक पाटील, सुनील जाधव, नवनाथ डिंगोळे, रियाज मणियार, गजानन चेऊलवार, बालाजी काटमपल्ले, देविदास हेमनर सह आदींनी पुढाकार घेतला.



