अहमदपूरचे शेतकरी भवन शेतकऱ्यांच्या विश्वासाचे प्रतिक – सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील

चाकूर : 22 ऑक्टोबर (मधुकर कांबळे )
शेतकरी भवन केवळ एक वास्तू नसून हे आपल्या शेतकऱ्यांच्या घामाने आणि कष्टाने उभारलेल्या विश्वासाचे प्रतीक ठरणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी “ग्रामगीता”च्या माध्यमातून ग्रामविकास आणि श्रमसंस्कृतीचा जो संदेश दिला, त्याच प्रेरणेने हे शेतकरी भवन उभे राहणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी केले.
अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उभारण्यात येणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाच्या शुभारंभ प्रसंगी उदघाट्क म्हणून ना. पाटील बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच साहेबराव जाधव,सहाय्यक निबंधक आदिनाथ पालवे, सांब महाजन, दिलीपराव देशमुख,हेमंत पाटील, बालाजी रेड्डी, शिवानंद हेंगणे, शिवाजी देशमुख, भारत चामे, अशोक केंद्रे, मुजीब पटेल, बाबासाहेब कांबळे,संजय पवार,अभय मिरकले,लक्ष्मीकांत कासनाळे,किशोर मुंडे,ॲड.टी. एन. कांबळे,अझहर बागवान, अमित रेड्डी, श्रीकांत बनसोडे, लक्ष्मीकांत बनसोडे, सुप्रिय बनसोडे,संग्राम चामे, तुकाराम पाटील, राजकुमार सोमवंशी, बळीराम भिंगोले, प्रशांत भोसले, निवृत्ती कांबळे, विकास महाजन, राम नरवटे, रहीम पठाण, सुनिल वाहुळे, गोंड महाराज, बापू सारोळे, गंगाधर ताडमे, मछिंद्र वाघमारे, सुरज पाटील, युवराज पाटील, माधव पवार, रामदास कदम, बालाजी कातकडे, सतिष नवटक्के, किशन पाटील , संतोष रोडगे, कैवल्या नागमोडे, इंदू पवार,यशवंत केंद्रे, शिवाजी पाटील, आण्णासाहेब कांबळे, शिवाजी खांडेकर, मुस्तफा सय्यद यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात पुढे बोलताना नामदार पाटील म्हणाले की,हे शेतकरी भवन शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक ठरणार आहे.शेतकऱ्यांना बैठका, मार्गदर्शन शिबिरे, कृषी सल्लागार कार्यक्रम, तसेच बाजार समितीच्या विविध योजनांची माहिती एका ठिकाणी मिळणार आहे.सरकारच्या आणि बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, त्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळावा, बाजारपेठेपर्यंत त्यांचा थेट संपर्क व्हावा यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. आगामी काळात बाजार समितीचे संपूर्ण डिजिटायझेशन, पारदर्शक व्यापार प्रणाली, तसेच शेतकऱ्यांसाठी साठवण व कोल्ड स्टोरेज सुविधा उभारण्याचेही आमचे प्रयत्न सुरू आहेत. आजची पायाभरणी फक्त इमारतीची नाही तर ती विश्वास, श्रम आणि स्वावलंबनाची पायाभरणी आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने अहमदपूर तालुका कृषी विकासाच्या क्षेत्रात नक्कीच नवे यश संपादन करेल, असा मला पूर्ण विश्वास असल्याचेही ना. पाटील म्हणाले.त्याचबरोबर अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही ना. पाटील यांनी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती मंचकराव पाटील यांनी केले.यावेळी दिलीपराव देशमुख,बाबासाहेब कांबळे, बालाजी रेड्डी, सांब महाजन यांची समोचित भाषणे झाली. सूत्रसंचालन माधव माने व दयानंद चोपने यांनी केले.
माझ्या जीवनातील आजचा मौलिक क्षण असून, भविष्यात बाजार समितीच्या माध्यमातून क्लोड स्टोरेजसाठी प्रयत्न करणार आहे. अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला सोयाबीन, कापूस खरेदीला मंजुरी मिळाली असून भविष्यात विद्यार्थी वसतीगृह साठी प्रयत्न करणार.
=====================================
मंचकराव पाटील
सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदपूर



