सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत देवंग्राचे आजीमाजी सरपंच, चेअरमन यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश.

चाकूर : 23 ऑक्टोबर (मधुकर कांबळे )
राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्ववार विश्वास ठेवत तालुक्यातील देवंग्रा येथील ग्रामपंचायतचे आजी -माजी सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन यांच्यासह अनेकांनी राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
गुरुवार दि.23 ऑक्टोबर रोजी शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी निवासस्थानी चाकूर तालुक्यातील देवंग्रा येथील सरपंच नामदेव शिंगडे,माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मारोती भूत्ते, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे चेअरमन नामदेव नरवाडे,ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नरवाडे,शिवाजी वाघमारे,संग्राम नरवाडे,विठ्ठल नरवाडे,अशोक तांदळे, नामदेव जाधव शिवाजी काळे, विजयकुमार गादेवार,राजकुमार जाधव,किशोर नरवाडे, बालाजी बामनकर, जनार्दन नरवाडे, मनोज करवंडे, मोहन जाधव,नरसिंग नरवाडे,गोविंद शिंदे, ब्रह्मदेव नरवाडे, माधव नरवाडे,ज्ञानोबा नरवाडे,सुहास जाधव, गिरधर नरवाडे,शिवाजी चव्हाण, वसंत आडे,गोविंद पारवे,व्यंकटराव जाधव आदीसह अनेकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत व अभिनंदन सहकारमंत्री ना.पाटील यांनी स्वागत करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी चाकूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अनिल वाडकर,सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू तिकटे, युवक तालुकाध्यक्ष संदीप शेटे, ॲड. संतोष गंभीरे पाटील उपस्थित होते.


