ताज्या घडामोडी

चाकूर अहमदपूर विधानसभा मतदार संघांच्या विकासासाठी मी सदैव तत्पर – आ. बाबासाहेब पाटील

चाकूर : 6मार्च /मधुकर कांबळे
चाकूर अहमदपूर विधानसभा मतदार संघांतील दोन्ही तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी सदैव तत्पर आहे. असे प्रतिपादन आ. बाबासाहेब पाटील यांनी केले.
चाकूर तालुक्यातील रोहिणा येथे मूलभूत सुविधा योजने अंतर्गत 20 लक्ष रुपयांच्या राममंदिर सभागृह कामाचे भूमिपूजन आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.त्यावेळी ते उदघाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरविंद केंद्रे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन मुंढे, नगर पंचायतचे गटनेते कारीमसाहेब गुळवे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते बालाजी सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य दयानंद सुरवसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यशवंत जाधव, राष्ट्रवादीचे चाकूर नगर पंचायतचे बांधकाम सभापती मिलिंदराव महालिंगे,राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष फुलारी, तालुका कार्याध्यक्ष भानुदास पोटे, अनिल वाडकर,शहराध्यक्ष शिवशंकर हाळे,सरपंच प्रकाश बंडे, सरपंच सुनील केसाळे,नगरसेवक मुज्जमील सय्यद, माजी नगरसेवक इलियास सय्यद, राष्ट्रवादी सेवादलाचे तालुकाध्यक्ष शिवदर्शन स्वामी, गणपत कवठे, तुकाराम जाधव, सिद्धेश्वरअप्पा अंकलकोटे, मनोज पाटील, जलीलसाब शेख, उद्धव महाराज बिराजदार, नवनाथ आवाळे,संदीप शेटे, बिलाल पठाण, समाधान जाधव, सचिन तोरे, आदित्य लवटे पाटील, चंद्रमनी सिरसाठ, रामकिशन चिंचोळे, विष्णु तिकटे, गणेश पाटील, धनराज बदनाळे, प्रमोद चवळे, सचिन बदनाळे, अजय घोरपडे, देवानंद पाटील, योगेश वाडकर, सोपान नितळे, राजकुमार चिंचोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात पुढे बोलताना आ. पाटील म्हणाले की,चाकूर अहमदपूर मतदारसंघात मंदिर सभागृहाचे काम मोठया प्रमाणात संपन्न झाले आहे. धार्मिक कार्यात नेहमीच माझी आग्रही भूमिका राहिली आहे. तसेच चाकूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु आहेत. तसेच प्रस्तावित कामांचा देखील सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आणखी विकासकामे मार्गी लागतील.असा विश्वासही आ. पाटील यांनी दिला.तसेच राजकीय जीवनात काम करत असताना पक्ष संघटन मजबूत ठेवण्यावर नेहमीच भर दिला आहे. कारण कार्यकर्ता हीच पक्षाची मोठी ताकद आहे. असे आ. पाटील म्हणाले.
यावेळी रोहिणा गावातील जेष्ठ नेते सुरेश मुंढे, श्यामराव महाराज केंद्रे, समाधान डोंगरे, ओम केंद्रे, राजेंद्र शिंदे, बाबूराव केंद्रे, राजेंद्र मुंढे, बालाजी डोंगरे, विठ्ठल डोंगरे, रोहिदास डोंगरे, मधुकर केंद्रे, पंकज केंद्रे, प्रमोद केंद्रे, मचिंद्र केंद्रे, माणिक केंद्रे, संतोष डोंगरे, नंदकुमार डोंगरे, कृष्णा केंद्रे, तुकाराम मुसळे, शेषेराव कांबळे, हरिबा शिंदे, श्रीमंतअप्पा मळभागे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील केंद्रे यांनी केले.सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बिलाल पठाण यांनी केले.

याच कार्यक्रमात रोहिणा येथील अनेकांनी आ. बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामध्ये ग्रा.प.सदस्य रामजी भंगे, अविनाश स्वामी, अजय जायभाये, समाधान जायभाये, विष्णू केंद्रे, अमोल केंद्रे, मंगेश केंद्रे, आदिनाथ डोंगरे, शंकर एकलिंगे, श्रीनिवास घुगे, विठ्ठल बोईन वाड, महादेव केंद्रे, आकाश मुसळे, रामेश्वर मुसळे, अल्ताफ शेख, महेश रोडे,भागवत बोइनवाड, कृष्णा डोंगरे, मकन शेख आदीचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??