आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भटक्या विमुक्त जाती व जमातीमधील वंचित लाभार्थ्यांना उपविभागीय अधिकारी फुलारी यांच्या हस्ते विविध शासकीय दाखल्याचे वाटप

लातूररोड येथील संत गोविंदबाबा मंदिराच्या सभागृहात पार पडला कार्यक्रम,अनेक लाभार्थी महिला व पुरुष बांधवांची उपस्थिती

चाकूर : 5 मार्च /मधुकर कांबळे
चाकूर तालुक्यातील लातूररोड येथील संत गोविंदबाबा मंदिराच्या सभागृहात अहमदपूरचे उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात फुलारी यांच्या हस्ते भटक्या विमुक्त जाती व जमातीमधील वंचित लाभार्थ्यांना विविध शासकीय दाखल्याचे वाटप करण्यात आले. यावेळी चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव व गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.सदरील कार्यक्रम लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली काल सोमवार दि. 4 मार्च 2024 रोजी घेण्यात आला.
या कार्यक्रमात एकूण 16 कुटुंबांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले, 19 लाभार्थ्यांना जातीचे दाखले देण्यात आले तर 17 लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्ड वाटप करण्यात आले. त्याचबरोबर 23 लाभार्थ्यांना जॉब कार्डचे वाटप करण्यात आले असून जवळपास 87 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच याच शिबिरात 54 लाभार्थ्यांचे नवीन आधार कार्ड काढून काहींच्या आधार कार्ड दुरुस्तीची कामे करण्यात आली. 19 नागरिकांचे नवीन बँक खाते काढण्यात आले तर 8 पात्र लाभार्थी यांचे श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजनेचे फॉर्म भरून घेण्यात आले.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र वडवळ (ना.) चे वैद्यकीय अधिकारी डॉ.नागनाथ नागरगोजे, डॉ. महादेव सोनवणे, सुषमा बोधगिरे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अंजली बगडे, फरहाना शेख यांच्यासह महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक एस.आर पवार, कर्मचारी महेश उतकर, विशाल केंद्रे व स्टेट बँक ऑफ इंडियाचे सचिन खोत, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नायब तहसीलदार दिगंबर स्वामी, मंडळ अधिकारी अभिजीत बेलगावकर, नागोराव गायकवाड, अव्वल कारकून अनिल कचरे, गुरुदत्त सुरवसे, गणेश विडेगोट्टी, बालाजी इंगळे, तलाठी बी.यू.पाटील, अविनाश पवार, प्रशांत तेरकर, बालाजी हाके, महसूल सहाय्यक संजय कासराळीकर, शशिकांत वाघमारे, लातूर रोड ग्रामपंचायतचे सरपंच घनश्याम मस्के, महा इ सेवा केंद्र संचालक, तालुका आरोग्य विभाग, स्टेट बँक ऑफ इंडिया व महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.या शिबिरास भटक्या विमुक्त जाती व जमातीमधील अनेक लाभार्थी महिला व पुरुष बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??