आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देवदर्शनासाठी निघालेल्या नांदेडच्या तरुणांवर काळाचा घाला , ट्रॅक्टरला कारची जोराची धडक – अपघातात चौघांचा मृत्यू

दोघांचा जागीच तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू - एकजण गंभीर जखमी

चाकूर : 3 मार्च /मधुकर कांबळे
नांदेडवरून तुळजापूरकडे जाणाऱ्या कारने लातूर-नांदेड महामार्गावरील आष्टामोड ते महाळंग्रा पाटी दरम्यान ऊसाच्या ट्रक्टरला पाठीमागून जोराची धडक दिल्यामुळे देवदर्शनासाठी निघालेल्या तरुणांवर काळाने घाला घातल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील चौघांचा मृत्यू झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की नांदेड येथील पाच तरूण एम. एच. 26 बी. सी. 8286 या क्रमांकाच्या कारमधून लातूरमार्गे तुळजापूरकडे देवदर्शनासाठी जात होते. लातूर- नांदेड महामार्गावरील आष्टामोड ते महाळंग्रापाटी दरम्यान शेतकऱ्यांचा ऊस घेऊन लातूरकडे जात असलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून येणाऱ्या कारने जोराची धडक दिली.यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.ही दुर्घटना रविवार दि.3 मार्च 2024 रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घटना घडली आहे.अपघातस्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी इतर तिघांना लातूर येथे उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी असून त्याच्यावर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अपघाताची माहिती मिळताच चाकूरचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, उपनिरीक्षक राजेश घाडगे, बीट अंमलदार भागवत मामडगे, शिरीषकुमार नागरगोजे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.पोलिसांनी मयताच्या नातेवाईकांना याची माहिती दिली आहे.

या अपघातात कारमधील शिवराम हरिश्चंद्र लंकाढाई ,मोनु बालाजी कोतवाल , नरमण राजाराम कात्रे,कृष्णा यादव यांचा अपघातात मृत्यू झाला असून शुभम किशोर लंकाढाई हे गंभीर जखमी झाले आहेत.पाचही तरुण नांदेड येथील रहिवाशी असल्याचे समजते.हे सर्वजण नांदेडवरून तुळजापूरला देवदर्शनाला जात होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??