आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चाकूर तालुक्यातील नऊ परीक्षा केंद्रावर 2,110 विद्यार्थ्यांनी दिली दहावीची परीक्षा , 33 विद्यार्थी अनुपस्थित

तालुक्यात सर्व केंद्रावर बैठे पथक कार्यरत ,भरारी पथकांच्याही परीक्षा केंद्रास भेटी

चाकूर: 1 मार्च /मधुकर कांबळे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेस आज शुक्रवार दि.1 मार्च पासून सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी चाकूर तालुक्यातील नऊ परीक्षा केंद्रावर 2110 विद्यार्थ्यांनी मराठी विषयाची परीक्षा दिली असून 33 विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते.
तालुक्यातील नऊही परीक्षा केंद्रावर शांततेत व सुरळीत परीक्षा पार पडली असून मराठीचा पहिला पेपर 2110 विद्यार्थ्यांनी दिला तर. मराठी विषयासाठी परीक्षेत प्रविष्ट झालेल्या 2143 विद्यार्थ्यांपैकी 33 विद्यार्थी परीक्षेस अनुपस्थित होते.
चाकूर तालुक्यात दहावीसाठी एकूण नऊ परीक्षा केंद्र असून त्यात जगत जागृती विद्यामंदिर चाकूर ,भाई किशनराव देशमुख माध्यमिक विद्यालय चाकूर ,संजीवनी विद्यालय चापोली ,जिल्हा परिषद प्रशाला नळेगाव, जिल्हा परिषद प्रशाला वडवळ (ना.), भगतसिंग विद्यालय आष्टा,डॉ. मधुसूदन बांगड विद्यालय अजनसोंडा, स्वामी विवेकानंद विद्यालय जानवळ, शंकर विद्यालय आटोळा या केंद्राचा समावेश आहे.
परीक्षा सुरळीत व कॉपीमुक्त पार पडण्याकरता प्रत्येक केंद्रावर तहसील, पंचायत समिती व शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे बैठे पथक तयार करण्यात आले आहे.परीक्षा दरम्यान सर्व केंद्रावर हे बैठे पथक उपस्थित होते. तसेच जिल्हा स्तरावरून व तालुका स्तरावरून अधिकाऱ्यांनी अनेक केंद्रास भेट दिली.
तालुक्यातील परीक्षेचा कारभार सुरळीत पार पाडण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूरच्यावतीने परिरक्षक म्हणून गोपाळ एनकफळे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सह परिरक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. एनकफळे यांना परिरक्षक कार्यालयात महेताब शेख, मयूर कांबळे, राम शेवाळे मदत करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??