आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चाकूर तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी,चाकूरात ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण

चाकूर : 11 एप्रिल /मधुकर कांबळे
चाकूर व चाकूर तालुक्यात आज गुरुवार दि.11एप्रिल 2024 रोजी रमजान ईद मोठया उत्साहात व आनंदाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. चाकूर येथील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यात आले.यावेळी मुस्लिम बांधवांनी मोठी गर्दी केली होती.तसेच तालूक्यातील ग्रामीण भागातही अनेक गावात रमजान ईदच्या निमित्ताने नमाज पठण करण्यात आले.
मुस्लीम समाजासाठी रमजान ईद अर्थात ‘ईद-उल-फित्र’ हा सण खूप महत्वाचा मानला जातो.भारतातच नव्हेतर ज्या ठिकाणी मुस्लिम बांधव वास्तव्यास आहेत अशा जगातील सर्वच राष्ट्रामध्ये हा सण साजरा केला जातो.या सणाच्या अगोदर मुस्लीम बांधव रमजानच्या पवित्र महिन्यात पूर्ण एक महिना उपवास म्हणजेच रोजा करतात.आणि शेवटच्या दिवशी ‘ईद-उल-फित्र’ अर्थात रमजान ईद साजरी करतात. रमजान महिना म्हणजे प्रार्थना आणि रोजा करण्याचा पवित्र महिना मानला जातो.

आज सकाळी साडेदहा वाजता ईदगाह मैदानावर मुस्लीम बांधवानी पविञ रमजान ईदची नमाज पठण केली.त्यानंतर सर्व उपस्थित मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच ईदगाह मैदानाबाहेर माजी आमदार बब्रुवान खंदाडे,चाकूरचे नगराध्यक्ष कपील माकणे,उपनगराध्यक्ष अरविंद बिरादार,माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान बांधकाम सभापती मिलिंद महालिंगे,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर,राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते बालाजी सूर्यवंशी, अनिल वाडकर, नगरसेवक नितीन रेड्डी,राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ एडके,सेवादलाचे तालुकाध्यक्ष शिवदर्शन स्वामी,बाळु लाटे,राम कसबे,पपन कांबळे,सागर होळदांडगे,संदीप शेटे,बालाजी भोरे,तानाजी धोंडगे,चंद्रमणी सिरसाठ यांच्यासह अनेकांनी मुस्लीम बांधवाना शुभेच्छा दिल्या.ऊन्हाचा त्रास होऊ नये म्हणून ईदगाह मैदानावर बसण्यासाठी भव्य मंडप उभारण्यात आला होता.ईदगाह मैदान परिसरात चाकूर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.महसूल प्रशासनाकडून मंडळ अधिकारी एन.के.गायकवाड व तलाठी अविनाश पवार उपस्थित होते.

जगातील प्रत्येक माणसाला सुखी ठेवण्याची अल्लाहकडे मागणी
====================
अल्लाह [ईश्वर] तू दयावान आहेस.मानवाला तुच जीवनदान देणार आहेस.गरीब,कष्टकरी व श्रीमंत या सर्वांचा दाता तुच आहेस .माणूस म्हणून आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर क्षमा कर अशी यावेळी अल्लाहकडे प्रार्थना करण्यात आली.तसेच मानव जातीचे आपापसातील प्रेम चिरकाल टिकुन राहू दे, संपूर्ण जगाला एक संघ ठेव.जगावरील आर्थिक संकट दुर करून जगातील प्रत्येक माणसाला सुखी ठेवण्यासाठी नमाज पठनानंतर अल्लाहकडे विशेष दुवा करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??