श्रीराम अक्षदा कलशाचे चाकूरात जोरदार स्वागत
पालखी सोहळ्यात भाविकांची मोठी गर्दी, श्री राम प्रभू नामांचा जयघोष
चाकूर : 29 डिसेंबर / मधुकर कांबळे
आयोध्या येथून निघालेल्या श्रीराम अक्षदा कलशाचे चाकूर शहरात जोरदार स्वागत करण्यात आले.यावेळी निघालेल्या पालखी सोहळ्यात शेकडो राम भक्त सहभागी झाले होते.श्री राम प्रभु नामांच्या जयघोघोषणेने चाकूर नगरी दणानून गेली होती.
22 जानेवारी 2024 रोजी आयोध्या येथे श्री राम जन्मभूमी मंदिरात देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व देश विदेशातील महंतांच्या उपस्थितीत श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून त्या अनुषंगाने चाकूर येथील विश्वशांती धाम मंदिर येथे काल गुरुवार दि.28 डिसेंबर 2023 रोजी आयोध्यावरून आलेल्या श्रीराम अक्षदा कलशाचे फुलांनी सजलेल्या पालखीमध्ये ठेवून विधिवत पूजन करण्यात आले.
विश्वशांती धाम मंदिर येथून अक्षदा कलश पालखीची ढोल ताशांच्या गजरात व फटाक्याची अतिषबाजी करून भव्य पालखी मिरवणुक काढण्यात आली.ही पालखी मिरवणूक नवीन बस स्थानक, जुने बस स्थानक, स्वामी विवेकानंद चौक,मुख्य बाजारपेठेतून,आझाद चौक येथील श्रीराम मंदिर येथे नेण्यात आली. श्री राम मंदिरात या पवित्र कलशाचे मनोभावाने पूजन करून महाआरती करण्यात आली.या पालखी सोहळ्याला महिला व पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालखी सोहळ्यात श्रीकिशन बाहेती,राजाराम माने, अरविंद बिरादार,सुरज सोनटक्के,मानसी सराफ,ओमप्रकाश लोया,सिद्धेश्वर पवार, नितीन रेड्डी,हणमंत शेळके, गुणवंत जानकर,नितीन जानकर, ज्ञानेश्वर बेजगमवार,श्याम बनकर, विनय दीक्षित,अनिल कुलकर्णी,शिवसांब गंगापूरे,अभय सुवर्णकार,अशोक शेळकेगोविंद जोशी,रविंद्र निळकंठ, कौस्तुभ सुवर्णकार,अविनाश गोलावार,प्रशांत महाजन,अंकुश जनवाडे,सतीश झांबरे,श्रीकांत सुवर्णकार,शुभम भातके,राहुल चव्हाण, मारुती हुडगे,अविनाश सूर्यवंशी,बालाजी कोईलवाड,प्रवीण सूर्यवंशी,गणेश गांजुरे,आदी राम भक्त सहभागी झाले होते.