चाकूर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शिवशंकर टाक तर सचिवपदी दत्तात्रय मेहेकरे यांची सर्वानुमते निवड
चाकूर : 24 डिसेंबर /मधुकर कांबळे
चाकूर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शिवशंकर टाक तर सचिवपदी दत्तात्रय मेहेकरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.चाकूर येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या निवडीत उर्वरित कार्यकारणी:उपाध्यक्ष-संजय पाटील,सहसचिव-साकराप्पा वाघमारे,कोषाध्यक्ष-अशोक बिराजदार,प्रसिद्धीप्रमुख-दिपक पाटील,जिल्हा प्रतिनिधी-संगमेश्वर जनगावे,सदस्य-बापुराव माने,किसन वडारे,सुनील जाधव आदीची निवड करण्यात आली आहे.
नूतन पदाधिकाऱ्यांचा पत्रकार संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला.यावेळी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रशांत शेटे, ॲड.विनोद निला, सुधाकर हेमनर,माधव वाघ,माधव तरगुडे, सदाशिव मोरे,संग्राम वाघमारे, विकास स्वामी,अशोक वाकळे,दयानंद सूर्यवंशी , राजकुमार जगताप, दत्तात्रय बेंबडे, सतीश गाडेकर, बापूराव माने, चेतन होळदांडगे आदिजण उपस्थित होते