आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चाकूरातील जगत जागृती विद्यामंदिरात तब्बल 37 वर्षांनी शालेय मित्रांचा भरला स्नेहमेळावा

विद्यार्थ्यांनी केला गुरुजनांचा सत्कार, अनेकांनी दिला जुन्या आठवणीना उजाळा

चाकूर : 23 जानेवारी / मधुकर कांबळे
येथील जगत जागृती विद्यामंदिरातील दहावी 1987 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा अर्थात गेट टुगेदर कार्यक्रम रविवार दि.21 जानेवारी 2024 रोजी आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला.
या विद्यालयातील दहावी 1987 बॅचच्या विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा आशीर्वाद व वर्ग मित्र मैत्रिणीच्या गाठीभेटी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमास माजी मुख्याध्यापक दत्तात्रय भोसले, देवराव सावंत, नागनाथ उस्तुर्गे,माणिकराव कुलकर्णी, नागनाथ साळी,हरिहर मिरकले, बाबुराव ढोबळे, नामदेव इंद्राळे,व्यंकटराव धोंडगे,रघुनाथ मोरगे,पंढरीनाथ मुंडे, श्रीहरी मुंडे,सोपानराव आलापुरे, माणिकराव शेटे, शंकरराव बारुळे, रघुनाथ शेरखाने,विनायक दिवे, सुनिता खंडागळे, विमल बिराजदार, महेबूबअली शेख, बाबुराव केराळे आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
दिवसभर चाललेल्या या स्नेह मिलन कार्यक्रमात 1987 साली इयत्ता दहावी वर्गाला अध्यापन करणाऱ्या व अन्य शाळेतील गुरुजनांचा शाल, पुष्पहार व भेटवस्तु देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी दत्तात्रय भोसले, देवराव सावंत व श्रीहरी मुंडे या गुरुजनांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .तसेच दत्तात्रय सूर्यवंशी, विजया बिरादार, उत्तम वाघ,सुनिता शिंदे,अनुपमा होळदांडगे,पुरुषोत्तम जोशी, प्रा.दिलीप मोरगे, प्रा. डॉ.रमेश कांबळे, दिलीप गायकवाड या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील जुन्या आठवणीना उजाळा दिला.अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपापल्या जुन्या वर्गात जाऊन बसण्याचा आनंद घेतला. तसेच आपल्या मित्रांशी गप्पागोष्टी करत जुन्या आठवणी जागृत केल्या.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने आली. तसेच दिवंगत शिक्षक व दिवंगत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी पाटील यांनी केले. सूत्रसंचालन हाकाणी सौदागर यांनी तर आभार प्रदर्शन मधुकर कांबळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्नेह मित्र मिलन संयोजन समितीचे सुनील बेजगमवार, देवेंद्र टोंपे, विजय चेऊलवार, दिलीप शेटे, ग्यानोबा गोलावर,विजय उस्तुर्गे,शिवशंकर धोंडगे, राम चिंते सादिक नदाफ, बाबू लोकरे, युनूस सय्यद,मोहिब पठाण,रमेश सावळे,संतराम मोठेराव, संजय लोया, दिवाकर मोठेराव, यांच्यासह स्नेह मित्र मिलन संयोजन समितीने परिश्रम घेतले.या कार्यक्रमास अरुणा उडते, सुशीला झांबरे, जयश्री हाके, अप्सरा शेख,शिवनंदा हिप्पाळे,मनोहर किसवे,अब्दुलरहीम शेख,बालाजी साळी, बस्वराज रासुरे,शाकीर कोतवाल,सरदार शेख, गफार तांबोळी,गफार मणियार, अरुण काळे ,नरसिंग साबणे,तुकाराम मोठेराव, विजयकुमार महालिंगे, हाकाणी शिकलकर, संजय काळवणे, संजय उस्तुर्गे, माधव जाधव, सूर्यकांत महाजन, शिवाजी कदम, शिवराज जाधव, विवेकानंद ढोबळे, दादासाहेब पाटील, नागनाथ मुठे, माधव गायकवाड, गिरीधर साठे,राजाराम घुगे, विठ्ठल सूर्यवंशी,भिवाजी कोईलवाड,बस्वराज आवाळे, माधव कांबळे, विजयकुमार मोठेराव, माधव डोंगरे,सूर्यकांत कदम,बाबासाहेब गायकवाड,बालाजी तत्तापुरे यांच्यासह माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठया संख्येनी उपस्थित होते.

जळगाव येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यरत असलेले प्रा. डॉ. रमेश कांबळे यांचा उच्च विद्याभूषित पदवी प्राप्त केल्याबद्दल व पत्रकारितेमध्ये आपल्या लेखणीतून विविध विषयांना वाचा फोडणारे दै.सामनाचे लातूर जिल्हा प्रतिनिधी अभय मिरजकर या दोन विद्यार्थांचा गुरुजनांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??