पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्यावतीने त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
अनेक मान्यवरांनी केले माता रमाईंना अभिवादन
चाकूर : 7 फेब्रुवारी / मधुकर कांबळे
चाकूर शहरात त्यागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांची 126 वी जयंती मोठया उत्साहात व आनंदाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.
छत्रपती शाहू महाराज चौकामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टी चाकूरच्या वतीने माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी रिपाइचे जेष्ठ नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण तिकटे, जेष्ठ पत्रकार मधुकर कांबळे व पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे चाकूर तालुकाध्यक्ष मिलिंद कांबळे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास नगरसेवक अभिमन्यू धोंडगे,नितीन रेड्डी,रिपाइ तालुकाध्यक्ष पपन कांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष रंगनाथ वाघमारे, बौद्धाचार्य धोंडीबा गायकवाड,जेष्ठ नेते श्रीकांत बनसोडे ,अर्जुन कांबळे,मारोती गायकवाड,सिद्धार्थ किनीकर,रोहित कांबळे,अनुज कांबळे, कुमार कांबळे,अशोक कांबळे, आदेश बनसोडे, नरसिंग गायकवाड, रजत भोळे, यशपाल सूर्यवंशी, रुपेश गायकवाड, सचिन सोनकांबळे, मयूर पाडमुखे, शिवा हांडे, ओम पिकवे, आदित्य कांबळे, सुभाष गायकवाड,अंगद शेळके आदीसह भीमसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. तसेच मधुकर कांबळे व लक्ष्मण तिकटे यांनी माता रमाबाई आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन मिलिंद कांबळे यांनी केले.