ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा बी.चंद्रकांत रेड्डी यांनी स्वीकारला पदभार : चाकूरला पुन्हा आय. पी. एस. अधिकारी

चाकूर : 20 डिसेंबर / मधुकर कांबळे
चाकूर येथील उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात आयपीएस निकेतन कदम यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागेवर उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नव्याने आयपीएस बी.चंद्रकांत रेड्डी हे रुजू झाले असून त्यांनी काल मंगळवार दि.19 डिसेंबर 2023 रोजी आपल्या पदाचा रीतसर पदभार स्विकारला.रेड्डी यांच्या रूपाने चाकूरला दुसऱ्यांदा आयपीएस अधिकारी लाभले आहेत.
बी.चंद्रकांत रेड्डी हे आंध्रप्रदेश राज्यातील विजयवाडा जिल्ह्यातील रहिवाशी आहेत.त्यांनी 2017 मध्ये अभियांत्रिकी शाखेतील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ही पदवी संपादन केली असून सन 2021-22 यावर्षात वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी ते आयपीएस परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.यापूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील पोलीस ठाण्यात परिविक्षाधीन सेवा म्हणून बारा आठवड्यांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.तर चाकूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी या पदावर रुजू झाले आहेत.चाकूर उपविभागात चाकूरसह रेणापूर व शिरूर अनंतपाळ या तालुक्याचा समावेश आहे.त्यामुळे रेड्डी हे तीन तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??