आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चाकूर तालुक्यात 2175 विद्यार्थ्यांनी दिली बारावीची परीक्षा तर 69 विद्यार्थी अनुपस्थित

भाई किशनराव देशमुख महाविद्यालयात प्राचार्य डॉ. सर्जेराव शिंदे यांनी केले विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

चाकूर : 21 फेब्रुवारी / मधुकर कांबळे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेस राज्यभरात आज बुधवार दि.21 फेब्रुवारी 2024 पासून सुरुवात झाली असून चाकूर तालुक्यातील सहा परीक्षा केंद्रावर इंग्रजी विषयाची परीक्षा अत्यंत सुरळीत पार पडली आहे.आज पहिल्याच दिवशी चाकूर तालुक्यातील सहा परीक्षा केंद्रावर 2175 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून 69 विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. चाकूरातील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयात प्राचार्य डॉ. सर्जेराव शिंदे व प्रा. बाळासाहेब बचाटे यांनी परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
चाकूर तालुक्यात सहा परीक्षा केंद्र असून चाकूरातील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयात 474, चापोली येथील संजीवनी महाविद्यालयात 850, चापोली येथील संत ज्ञानेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात 246,कबनसांगवी येथील महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयात 236, नळेगाव येथील शिवजागृती महाविद्यालयात 238 तर जानवळ येथील कै. जनार्धन राजमाने कनिष्ठ महाविद्यालयात 200 असे एकूण 2244 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले असून त्यापैकी आज झालेल्या परीक्षेला सहा परीक्षा केंद्रावर 2175 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा सुरळीत व कॉपीमुक्त पार पाडण्याकरिता प्रत्येक परीक्षा केंद्रावर महसूल व शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी बैठे पथकात उपस्थित होते.

तालुक्यातील परीक्षेचे काम सुरळीत पार पाडण्यासाठी चाकूर येथील जगत जागृती विद्यालयात परिरक्षक कार्यालय (CU 240 ) सुरु करण्यात आले असून परिरक्षक म्हणून गोपाळ माणिकराव एनकफळे यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूर यांच्याकडून करण्यात आली आहे. त्यांना सहकारी उपपरीरक्षक म्हणून महताब शेख व मयूर कांबळे हे काम करीत आहेत

भाई किशनराव देशमुख महाविद्यालयास तहसीलदार देवणीकर व उपसंचालक डॉ.मोरे यांची भेट
=================================
भाई किशनराव देशमुख महाविद्यालयास पहिल्याच दिवशी इग्रंजीचा पेपर चालू असताना चाकूरचे तहसीलदार रेणुकादास देवणीकर व लातूर विभागाचे उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे यांनी परीक्षा केंद्रास भेट देऊन पाहणी केली.परीक्षा अतिशय चांगल्या प्रकारे शांततेत आणि सुरळीत चालू असून बैठक व्यवस्था चांगली असल्याचा अभिप्राय त्यांनी देवून परीक्षा बाबत समाधान व्यक्त केले.
या परीक्षा केंद्रावर 474 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट असून आज 454 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.प्राचार्य डॉ. सर्जेराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र संचालक म्हणून प्रा. बाळासाहेब बचाटे हे काम पाहत आहेत आहेत.त्यांना प्रा.एच.एच.सय्यद सहकार्य करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??