आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाई किशनराव देशमुख महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावरील दुर्मिळ ग्रंथाचे प्रदर्शन

चाकूर : 29 एप्रिल / मधुकर कांबळे
येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने सोमवार दि.29 एप्रिल 2024 रोजी माजी विद्यार्थी संघाच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर विविध लेखकांनी लिहिल्या दुर्मिळ ग्रंथाचे प्रदर्शन भरविण्यात आले.
या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन जेष्ठ विधिज्ञ तथा लोकायत शिक्षण संस्थेचे सचिव ॲड.पी.डी.कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ.सर्जेराव शिंदे, विद्यापीठ सिनेट सदस्य ॲड.युवराज पाटील, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रशांत शेटे,उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळे,कोषाध्यक्ष मधुकर कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र ग्रंथ प्रदर्शनास डॉ. रमेश साळी, प्रा. आर. व्ही. विभुते, डॉ. शाम जाधव, डॉ. मगदूम बिदरे, डॉ. राजेश तगडपल्लेवार,डॉ. जनार्धन वाघमारे,पर्यवेक्षक प्रा. बाळासाहेब बचाटे, प्रा. रमेश शिंदे, प्रा. प्रतिक राजमाने, प्रा. विजयकुमार भालेकर, प्रा. ज्ञानोबा हेमनर, डॉ. सुमित देशमुख, डॉ. नामदेव गौंड, डॉ. नागोराव आसोले, प्रा. ब्रम्हानंद पासामे, प्रा. मंगल माळवदकर, प्रा. बबिता मानखेडकर,कार्यालय अधिक्षक ज्ञानोबा येमले,आकाश पाडूळे, बाळासाहेब जाधव यांनी व विद्यार्थ्यांनी भेटी देऊन ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घेतला.
या ग्रंथ प्रदर्शनासाठी मधुकर कांबळे,प्रा.भिमराव साळवे प्रा. दिपक बुकटे यांनी सहकार्य केले.
या ग्रंथ प्रदर्शनास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी, वाचकांनी भेट देऊन दुर्मिळ ग्रंथाचा लाभ घेतला.
ग्रंथ प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी एकनाथ भोसले, अश्फाक शेख, हिरामन राठोड , दत्तात्रय कोकरे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??