आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अनुसूचित जमातीतून धनगर आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्यातून आष्टा येथील तरूणाची रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या

आत्महत्या करण्यापुर्वी रमेश फुले यांनी चिट्टी लिहून केली आत्महत्या

चाकूर : 25 डिसेंबर / मधुकर कांबळे
चाकूर तालुक्यातील आष्टा येथील रमेश चंद्रकांत फुले वय ३३ वर्षे या तरूणाने धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून (एस टी ) धनगर आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्यातून 24 डिसेंबर 2023 मध्यरात्रीच्या सुमारास रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.आत्महत्या करण्यापुर्वी रमेश फुले यांनी चिट्टी लिहून आत्महत्या केली आहे.रमेश फुले यांचे बारावी पर्यंतचे शिक्षण झाले असून आई वडील,रमेश व त्यांची पत्नी मोलमजूरी करून आपली उपजिवीका भागवत होते.अनेक वेळा धनगर आरक्षण लढ्यामध्ये सहभागी होऊन धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विविध आंदोलनात सहभागी घेतला होता.परंतु एस. टी. प्रवर्गातून आरक्षण मिळत नसल्यामुळे नैराशातून रमेश यांनी आत्महत्या करून जीवन संपविले.
या घटनेची माहिती मिळताच नळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी भागवत मामडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला .नळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले.
जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा रमेश फुलेंच्या कुटुंबियांनी घेतला होता.त्यानंतर धनगर समाज विकास परिषद संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल गोयकर,अशोक करडिले,रमेश पाटील,सुधाकर हेमनर,सतिश गाडेकर,नारायण काचे,अमोल घायाळ,बालाजी इरळे,राम वाघमोडे,ओम देवकत्ते आदी समाज बांधवांनी चाकूरचे तहसिलदार यांना विविध मागण्याचे निवेदन दिले.सदरील निवेदनात रमेश फुले यांच्या कुटुंबियांना तात्काळ दहा लाखाची आर्थिक मदत मिळावी,कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत घ्यावे,नोकरीत एक महिन्याच्या आत समावून घेण्याचे लेखी हमीपत्र द्यावे,फुले यांच्या कुटुंबीयांस घरकुल तसेच शासकीय योजनेचा लाभ द्यावा,सरकारने याची गंभीर दखल घेऊन धनगर समाजाला एस.टी.आरक्षणाची अंंमलबजावणी करावी आदी मागण्याचे निवेदन चाकूरचे तहसिलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,राज्य मागासवर्गीय आयोग,गृहमंत्री,आ.गोपीचंद पडळकर,लातूर जिल्हाधिकारी यांना माहितीस्तव लेखी निवेदन देण्यात आले आहे.लेखी आश्वासन दिल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा सर्व समाज बांधवांनी घेतला होता.त्यानंतर तहसिलदार यांनी निवेदनातील सर्व मागण्या शासन दरबारी तात्काळ पाठवण्यात येत असून या सर्व मागण्या जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात येत असल्याचे लेखी पत्र दिल्यानंतर रमेश फुले यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला.रमेश फुले यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी दोन मुली,एक मुलगा व एक भाऊ असा परिवार आहे.

धनगर समाजाला ST मधून आरक्षण मिळण्यासाठी मी झटलो आहे. तरी सरकारने आरक्षण दिले नाही. मी खचून गेलो. मी आत्महत्या करत आहे. माझे लेकरे सरकारच्या स्वाधीन करत आहे.असा मचकूर असलेली चिट्ठी रमेश फुले यांनी आत्महत्या करण्यापूवी लिहून आत्महत्या केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??