आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

चाकूर नगरपंचायतीच्या विषय समितीच्या सभापती निवडी बिनविरोध, मात्र विरोधकांचेच सभापती निवडीत वर्चस्व कायम

आ. बाबासाहेब पाटील यांनी केला नूतन सभापतींचा सत्कार

चाकूर :16 फेब्रुवारी / मधुकर कांबळे
चाकूर नगरपंचायतीच्या विषय समिती सभापती पदाच्या निवडी बिनविरोध झाल्या असल्यातरी तीन सभापती पद स्वतःकडे खेचून आणत विरोधकांने सत्ताधाऱ्यांना धक्का देत या निवडीत पुन्हा एकदा आपले वर्चस्व निर्माण केले आहे.
विषय समितीच्या सभापती निवडीसाठी शुक्रवार दि.16 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी साडेबारा वाजता नगरपंचायतीच्या सभागृहात एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.पिठासीन अधिकारी म्हणून उप विभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी करण्यात आल्या. यावेळी मुख्याधिकारी अजय नरळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

(मिलिंद महालिंगे,सार्वजनिक बांधकाम सभापती )

(भागवत फुले, पाणीपुरवठा सभापती )

(अरविंद बिरादार, नियोजन व विकास सभापती )
——————————————————————————–
यामध्ये सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी मिलिंद गणपत महालिंगे,पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी भागवत बाळासाहेब फुले,महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी शबाना इलीयस सय्यद, स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापतीपदी वैशाली एकनाथ कांबळे यांची तर महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापतीपदी शाहीनबानू महमद सय्यद यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.तसेच पदसिद्ध सभापती म्हणून नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष अरविंद दिगंबर बिरादार यांची निवड झाली आहे.नूतन पाच सभापती हे स्थायी समितीचे सदस्य राहणार असून नगराध्यक्ष स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यामुळे नगराध्यक्ष कपिल माकणे हे स्थायी समितीचे अध्यक्ष असणार असून नगर पंचायतीचे ध्येय धोरणे ठरविण्यासाठी स्थायी समितीला फार महत्वाचे स्थान असते.
(शबाना सय्यद, महिला व बालकल्याण सभापती )

(वैशाली कांबळे,स्वच्छता व आरोग्य सभापती)
——————————————————————————-
सध्या नगरपंचायतीमध्ये प्रहार व भारतीय जनता पार्टीच्या युतीची सत्ता असून विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पार्टीची आघाडी आहे.17 नगरसेवक व दोन स्वीकृत नगरसेवक असे एकूण 19 नगरसेवक नगर पंचायतमध्ये असून त्यापैकी काल झालेल्या विषय समिती सभापती निवडीच्यावेळी 18 नगरसेवक उपस्थित होते. विशेष म्हणजे सत्ताधारी गटाच्या शुभांगी कसबे या नगरसेविकेने विरोधी गटाला पाठिंबा दर्शविल्याने विरोधकांचे संख्याबळ वाढल्याने विरोधकांचे तीन सभापती बिनविरोध निवडून आले आहेत. तर केवळ एकाच जागेवर सत्ताधारी पक्षाला या निवडीत समाधान मानावे लागले आहे.मागील वर्षाच्या निवडीतही भाजपच्या एका नगरसेवकांने विरोधकांना सहकार्य केल्याने असेच चित्र निर्माण झाले होते. तीच परंपरा कायम ठेवत याही निवडीत विरोधकांने विषय समितीच्या सभापती निवडीच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना धक्का दिल्याचे दिसून येत आहे. अवघ्या काही महिन्यावर नवीन अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या निवडी होणार असल्याने या सभापती निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
या निवडीच्यावेळी नगराध्यक्ष कपिल माकणे, गटनेते करीमसाहेब गुळवे, गटनेत्या हिरकणबाई लाटे, नगरसेवक विलासराव पाटील, नितीन रेड्डी,साईप्रसाद हिप्पाळे, मुज्जमील सय्यद,नगरसेविका गोदावरी पाटील, गंगुबाई गोलावर, ज्योती स्वामी, सुजाता रेड्डी, शुभांगी कसबे उपस्थित होते.

आ. बाबासाहेब पाटील यांनी केला नूतन सभापतीचा सत्कार
===================
चाकूर अहमदपूर तालुक्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी सर्व नूतन सभापतीचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.चाकूरच्या विकास कामासाठी मी सदैव तत्पर असून विकास कामासाठी माझे नेहमी सहकार्य राहील असे आश्वासन प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीशी बोलताना आ. पाटील यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??