ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आ.बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत सिटी प्रेस क्लब चाकूरच्यावतीने दर्पण दिन साजरा

सिटी प्रेस क्लब चाकूर पुढील वर्षांपासून मराठवाडा स्तरीय पाच पुरस्कार देणार

चाकूर : 6 जानेवारी / मधुकर कांबळे
सिटी प्रेस क्लब चाकूरच्यावतीने चाकूर अहमदपूर तालुक्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दर्पण दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
येथील शासकीय विश्रामगृहात सिटी प्रेस क्लबच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या दर्पण दिनाच्या कार्यक्रमात आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.तसेच यावर्षीचे पुरस्कारप्राप्त पत्रकार संग्राम वाघमारे, रंगनाथ वाघमारे व विकास स्वामी यांचा सत्कार आ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चाकूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे,जेष्ठ पत्रकार अनिल वाडकर,सिद्धेश्वर अंकलकोटे,मधुकर मुंढे,अब्दुल शेख,धनंजय जाधव यांच्यासह सिटी प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रा.अ.ना.शिंदे,सचिव मधुकर कांबळे,दत्तात्रय बेंबडे,संगमेश्वर जनगावे,सतिश गाडेकर, नवनाथ डिगोळे, चेतन होळदांडगे, सलीम तांबोळी,सुशील वाघमारे,सुनील जाधव आदी पत्रकार उपस्थित होते.

पुढील वर्षांपासून सिटी प्रेस क्लब चाकूरच्यावतीने मराठवाडा स्तरीय पत्रकार पुरस्कार देणार
===================
सिटी प्रेस क्लब चाकूरच्यावतीने पुढील वर्षांपासून मराठवाडा स्तरीय प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक /डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकार बंधू भगिनींना विविध पुरस्कार देण्यात येणार असून त्यामध्ये पत्रकार प्रा.अ.ना.शिंदे यांच्यावतीने स्व.नागोराव शिंदे यांच्या स्मरणार्थ,पत्रकार दत्तात्रय बेंबडे यांच्यावतीने स्व.नरसिंग बेंबडे व कै.प्रयागबाई बडगिरे यांच्या स्मरणार्थ,पत्रकार सलीम तांबोळी यांच्यावतीने जेष्ठ पत्रकार सी.बी.सय्यद यांच्या स्मरणार्थ व पत्रकार मधुकर कांबळे यांच्यावतीने मालनबाई कांबळे व सोपानराव कांबळे यांच्या स्मरणार्थ पुरस्कार देण्यात येणार आहेत.सदरील पुरस्काराची घोषणा 26 नोव्हेंबर 2024 रोजी केली जाणार असल्याची माहिती सिटी प्रेस क्लब चाकूरच्यावतीने देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??