आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अहमदपूर व चाकूर तालुक्यातील 2476 कर्मचाऱ्यांनी घेतले मतदानाचे पहिले प्रशिक्षण, तर 49 कर्मचारी अनुपस्थित

चाकूर : 9 एप्रिल /मधुकर कांबळे
सध्या देशभरात लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली असून राज्यात पाच टप्यात मतदान घेतले जाणार आहे.लातूर लोकसभा मतदार संघात तिसऱ्या टप्यात मतदान होणार आहे.ही निवडणूक घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून जय्यत तयारी झाली असून त्याचाच एक भाग म्हणून अहमदपूर विधानसभा मतदार संघातील अहमदपूर व चाकूर तालुक्यातील कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण रविवार दि.7 एप्रिल 2024 रोजी पार पडले असून अहमदपूर व चाकूर तालुक्यातील 2476 कर्मचाऱ्यांची या मतदान प्रशिक्षण वर्गास उपस्थिती होती.तर 49 कर्मचारी अनुपस्थित होते.
लातूरच्या जिल्हाधिकारी तथा लातूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अहमदपूरच्या उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदपूर येथील प्रसाद गार्डन मंगल कार्यलयात मतदान केंद्राध्यक्ष,मतदान सहाय्यक केंद्राध्यक्ष व इतर मतदान अधिकारी यांचे पहिले प्रशिक्षण पार पडले.यावेळी उपजिल्हाधिकारी तथा अहमदपूरचे निवडणूक संपर्क अधिकारी नितीन वाघमारे, चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव, अहमदपूरचे तहसीलदार शिवाजी पालेवाड, मास्टर ट्रेनर केशव काचे यांच्यासह क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.सदरील प्रशिक्षण दोन सत्रात घेण्यात आले.यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष 610, मतदान सहाय्यक केंद्राध्यक्ष 746 तर इतर अधिकारी म्हणून 1120 अशा एकूण 2476 कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले.मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडावी – उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे यांचे प्रतिपादन
=================================
या प्रशिक्षण वर्गात बोलताना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे म्हणाल्या की 7 मे 2024 रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या अगोदरच्या दिवशी मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात येणाऱ्या सर्व मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपणास दिलेली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडावी.ही निवडणूक प्रक्रिया सुरळीतरित्या पार पाडण्याची जबाबदारी प्रत्येक कर्मचाऱ्यांची असून मतदान केंद्रावर सर्वांनी मिळून हे सांघिक काम समजून काळजीपूर्वक करावे.मतदान केंद्रावर नियुक्त असलेले केंद्राध्यक्ष, व सर्व मतदान अधिकारी यांची भूमिका अतिशय महत्वाची राहणार असून सर्वांनी पारदर्शक, निःपक्षपाती काम करावे. काही अडचण आल्यास ताबडतोब संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा अशा सूचनाही लटपटे यांनी दिल्या.भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनाचे काटेकोपणे पालन करून बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट या मतदान यंत्राची जोडणी व मॉकपोलची प्रक्रिया सुरळीत पार पडावी. हे काम करताना काळजीपूर्वक करावे अशा सूचना उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे यांनी दिल्या.यावेळी उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे,चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव, अहमदपूरचे तहसीलदार शिवाजी पालेवाड यांनीही प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले.महात्मा गांधी महाविद्यालयात ईव्हीएमचे प्रात्यक्षिक
=================================
मतदान ईव्हीएम या मतदान यंत्रावर होणार असल्यामुळे सर्व उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना ईव्हीएमचे प्रात्यक्षिक मास्टर ट्रेनर यांनी करून दाखविले. बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट यांची जोडणी कशी करावी, मॉकपोल कसा घ्यावा, मतदान संपल्यावर मतदान यंत्र बंद कसे करावे याची सविस्तर माहिती प्रशिक्षणार्थ्यांना मास्टर ट्रेनर यांनी दिली.सदरील प्रात्यक्षिकचे प्रशिक्षण महात्मा गांधी महाविद्यालयात घेण्यात आले. बऱ्याच प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतः ईव्हीएम मतदान यंत्र हाताळले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??