क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जगत् जागृती विद्यामंदिच्या आनंदी शेटे ची राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

जिल्हा व विभागीय स्पर्धेत आनंदी नंबर वन, सर्व स्तरातून अभिनंदन

चाकूर : 26 डिसेंबर / मधुकर कांबळे
येथील जगत जागृती शिक्षण प्रसारक मंडळ चाकूरद्वारा संचलित जगत जागृती विद्यामंदिर चाकूर येथे इयत्ता सातवी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी कु.आनंदी दिलीप शेटे हिने 14 वर्षे वयोगट व 28 किलो वजन गटात विभागीय किक बॉक्सिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून विद्यालयाच्या यशामध्ये मानाचा तुरा रोवला असून आनंदीची राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल आनंदीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत विभागीय शालेय किक बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा नुकत्याच जिल्हा क्रीडा संकुल नांदेड येथे संपन्न झाल्या. विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत नांदेड ,लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांचा समावेश होता.या स्पर्धेमध्ये आनंदी शेटे हिने प्रथम क्रमांक पटकावून विद्यालयाच्या लौकिकात भर घातली आहे.यापूर्वी लातूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेतही आनंदी शेटे हिने प्रथम क्रमांक मिळविला होता.या विद्यार्थिनीस विद्यालयाचे क्रीडाशिक्षक संतोष चिटबोने व शंभू सोळंके यांनी मार्गदर्शन केले आहे. या यशस्वी विद्यार्थिनीचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन जगत जागृती शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नरेश पाटील चाकूरकर ,संस्थाध्यक्ष सर्वोत्तमराव कुलकर्णी, उपाध्यक्ष अर्जुन मद्रेवार, सहसचिव बाबुराव बिडवे, कोषाध्यक्ष सोमनाथ स्वामी,संस्थेचे संचालक ॲड.विक्रम पाटील चाकूरकर, विठ्ठलराव सोनटक्के, ॲड.सुधाकर मोतीपवळे, शिवप्रसाद शेटे,महादेव काळोजी, राजकुमार कदम,विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय नारागुडे, पर्यवेक्षक प्रदीप ऊस्तुर्गे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??