आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चाकूरात भर पावसात भीम जयंती जल्लोशात साजरी

चाकूर :16 एप्रिल /मधुकर कांबळे
महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती चाकूर शहरात मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.विशेष म्हणजे भर पावसातही मिरवणुकीत भीम अनुयायांनी आपला उत्साह तूसभरही कमी होऊ न देता अतिशय जल्लोषात भीमसैनिकांनी भीम जयंती साजरी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवार दि. 14 एप्रिल 2024 रोजी चाकूर शहरात सकाळच्या सत्रात शहराच्या विविध भागात पंचशील ध्वजाचे ध्वजारोह व अभिवादन कार्यक्रम पार पडला. सायंकाळी सहा वाजता बौद्ध नगर येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची सजलेल्या रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीसाठी आकर्षक रथासह विद्युत रोषणाई असलेला डॉल्बी, बँडबाजा व केलेली खास सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.डॉल्बीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध गाण्यावर तरुण तरुणाई सह वृद्धानीही नृत्यविष्कार करून आपला आनंद साजरा केला. तसेच कुमठा येथील माता रमाई लेझीम पथकातील मुलानीही अत्यंत चांगल्या देखाव्याने लेझीमच्या माध्यमातून निवडणुकीत रंगत आणली होती. मिरवणुकी दरम्यान अचानक मोठा पाऊस आला.मात्र मिरवणुकीत सहभागी झालेल्या बौध्द उपासक उपासिका व भीम अनुयायाने पावसाची तमा न बाळगता आपला आनंदोत्सव मोठया धूमधडाक्यात साजरा केला. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषणांनी चाकूर परिसर दणानून निघाला होता.
ही मिरवणूक बौद्ध नगर,महात्मा बसवेश्वर चौक,गणेश मंदिर,स्वामी विवेकानंद चौक,जुने बस स्थानक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, नवीन बस स्थानक मार्गे छत्रपती शाहू महाराज चौकामध्ये नेण्यात आली.याठिकाणी चाकूरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्याहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली.
मिरवणुकीच्या दरम्यान विविध ठिकाणी चाकूर शहरातील राजकीय पक्षांच्या मंडळींनी व सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.तर गोलेवर परिवाराकडून भीम अनुयायासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
मिरवणुकी दरम्यान खासदार सुधाकर शृंगारे यांनीही मिरवणूकीला हजेरी लावली. खा. शृंगारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच तरुणांच्या जल्लोषात सहभागी होऊन आंबेडकरांच्या गाण्यावर खासदारांनी चांगलाच ठेका धरला होता.यावेळी त्यांच्या समवेत भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके.चाकूरचे नगराध्यक्ष कपिल मागणे,नगरसेवक नितीन रेड्डी यांच्यासह जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मिरवणुकीत कोणता अनुचित प्रकार घडू नये व शांततेत मिरवणूक पार पाडण्यासाठी चाकूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
मिरवणुकीसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा नगरपंचायतचे बांधकाम सभापती मिलिंद महालिंगे, प्रभाकर गायकवाड, पपन कांबळे, विलास महालिंगे, नागसेन महालिंगे, सचिन चाकूरकर,बाबासाहेब कांबळे, संदीप महालिंगे, गोपीनाथ कांबळे, संदीपान वाघमारे, दीपक महालिंगे,रोहित कांबळे,चंद्रमणी सिरसाठ,मारोती गायकवाड, माधव कांबळे, विश्वनाथ कांबळे,सचिन गायकवाड, सुशील गायकवाड, सरपंच गायकवाड, किरण वाघमारे, देवा गायकवाड यांच्या सह जयंती महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??