आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

चाकूरात 51 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

शिक्षणाधिकारी नागेश मापारी यांच्या हस्ते उदघाटन ,तालुक्यातील साठ शाळांचा सहभाग

चाकूर : 23 डिसेंबर /मधुकर कांबळे
पंचायत समिती शिक्षण विभाग चाकूर व भाई किशनराव देशमुख विद्यालय चाकूर यांच्या संयुक्त विद्यमाने 51 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 21 व 22 डिसेंबर 2023 रोजी भाई किशनराव देशमुख विद्यालयात संपन्न झाले.यात स्पर्धक म्हणून तालुक्यातील 60 शाळेतील विद्यार्थी व दहा शिक्षकांनी सहभाग नोंदविला होता.या विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन लातूरचे शिक्षणाधिकारी नागेश मापारी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकायत शिक्षण संस्थेचे सचिव ॲड.पी. डी.कदम हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नूतन गटशिक्षणाधिकारी जयसिंह जगताप, जेष्ठ विस्तार अधिकारी संजय आलमले, मुख्याध्यापिका संजीवनी पवार, पर्यवेक्षक राजेश केसराळीकर, पत्रकार प्रा.अ.ना.शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रदर्शनात तालुक्यातील विविध शाळेतील बाल वैज्ञानिकांनी प्रयोगासह उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता.शिक्षणाधिकारी नागेश मापारी यांनी या प्रदर्शनातील सर्व प्रयोगाची पाहणी करून बाल वैज्ञानिकांच्या प्रयोगाचे कौतुक केले.तसेच विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनातील प्रयोग पाहत जिज्ञासू वृत्तीपणे विविध प्रश्नांची उकल प्रत्यक्ष करून घेतली. दोन दिवस पार पडलेल्या प्रदर्शनात उच्च प्राथमिक गटामध्ये प्रथम : चैतन्य मस्के (भाई किशनराव देशमुख माध्यमिक विद्यालय चाकूर प्रयोग – प्लास्टिक पासून इंधन निर्मिती ), द्वितीय : संस्कार घाळापुरे (जगत जागृती विद्यामंदिर, चाकूर प्रयोग – स्मार्ट ब्लाइंड स्टिक ), तृतीय : अजिंक्य मोगले (नेहरू विद्यालय नायगाव प्रयोग – धान्य परिरक्षक पर्यावरण गोळ्या ), दिव्यांगट : फैजान सय्यद (कै. नरसिंगराव चव्हाण विद्यालय नळेगाव प्रयोग – दिव्यांग काठी ) तर माध्यमिक गटामध्ये प्रथम : गजानन भोसले (कै. नरसिंगराव चव्हाण विद्यालय नळेगाव प्रयोग -पर्यावरण स्नेही खाद्यान्न गोळया ), द्वितीय : सृष्टी सुरवसे (सिद्धेश्वर विद्यालय झरी प्रयोग – सांडपाणी व्यवस्थापन ), तृतीय : महेक शेख व पल्लवी राठोड (विद्यानिकेतन विद्यालय वडवळ प्रयोग -चांद्रयान 3 ), दिव्यांग गट : सोनाली जाधव (सरस्वती माध्यमिक विद्यालय जानवळ प्रयोग – भरड धान्य ) तसेच शैक्षणिक साहित्य निर्मिती प्राथमिक शिक्षक गटामधून संतोष गायकवाड (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दापक्याळ शै. साहित्य – रामानुजन चौरस ), माध्यमिक गट – ए.डी.शेख (विद्यानिकेतन विद्यालय, वडवळ शै. साहित्य -मानवी शरीर रचना व जीवनप्रक्रिया ) तर प्रयोगशाळा सहायक गट – समाधान तलवारे (जगत जागृती विद्यालय चाकूर शै.साहित्य -वैज्ञानिकांची माहिती)यांनी यश संपादन केले आहे.या सर्व विजेत्या स्पर्धकांना जिल्हास्तरीय प्रदर्शनामध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.विजेते बालवैज्ञानिक व शिक्षक स्पर्धक यांना नगराध्यक्ष कपिल माकणे, नगरसेवक नितीन रेड्डी, संजय आलमले, संजीवनी पवार, गोपाळ एनकफळे आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी गटशिक्षणाधिकारी जयसिंह जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, विभाग प्रमुख विजय गूर्मे,तालुका विज्ञान विभाग प्रमुख धनराज सूर्यवंशी, बरखा राऊत, रविराज देशमुख, जयेश कर्डिले, मेहताब शेख, हरिश्चंद्र पवार,अभिमन्यू थोरात यांच्यासह भाई किशनराव देशमुख विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रमेश नलमले यांनी तर आभार प्रदर्शन तुकाराम येडले यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??