आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन गरजेचे – आ. बाबासाहेब पाटील

केशवराव पाटील विद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

चाकूर :14 फेब्रुवारी / मधुकर कांबळे
शाळेतून विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच अन्य क्षेत्रातीलही ज्ञान शिक्षकांनी दिले पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगी काही सुप्त गुण असतात. अशा सुप्त कलागुणांना ओळखून त्यांच्या कलेला वाव देण्यासाठी शाळेत स्नेहसंमेलन होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन चाकूर अहमदपूर तालुक्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले.
चाकूर तालुक्यातील बोथी येथील आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब जाधव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष गंगाधरअप्पा अक्कानवरू, माजी पोलीस पाटील बालासाहेब पाटील,चंद्रहंस पाटील,सोसायटीचे चेअरमन रामेश्वरअप्पा अक्कानवरू,राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते गणपतराव नितळे,केंद्र प्रमुख रामराम हावडे,बोथीचे सरपंच बालाजी आवाळे, सांडोळचे सरपंच प्रकाश बंडे, शिरनाळचे सरपंच सुनील कांबळे, कलकोटीचे सरपंच परमेश्वर कांबळे, तीर्थवाडीचे सरपंच हणमंत नरवटे, बोथीचे उपसरपंच धर्मपाल पवार, राष्ट्रवादीचे युवा नेते शैलेश कदम,नवनाथ आवाळे, बळीराम पाटील, सेवानिवृत्त शिक्षक चंदर जाधव, विद्यार्थी नेते समाधान जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात पुढे बोलताना आ. पाटील म्हणाले की स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. हा विकास करण्याचे एकमेव केंद्र शाळा आहे. शाळेतूनच कलाकार, खेळाडू ,वक्ते,अधिकारी, साहित्यिक निर्माण होत असतात.प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी कोणती ना कोणती कला असते. या कलेचा शोध घेऊन अशा कलावंत विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम शिक्षकाने करावे. अशा स्नेहसंमेलनातून उद्याचे मोठे कलाकार निर्माण होतात असेही आ.पाटील म्हणाले.त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी खेळाकडे लक्ष दिले पाहिजे असे सांगून खेळाची मैदानी विद्यार्थ्यांनी भरून गेली पाहिजेत.शरीर स्वास्थ चांगले राहण्यासाठी खेळ अत्यंत महत्त्वाचा असून प्रत्येकानी नियमित व्यायाम करावा व एखादातरी खेळ खेळवा असा मौलिक सल्लाही आ.पाटील यांनी दिला.केशवराव पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांचे आ. पाटील यांनी भरभरून कौतुक केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.तसेच दीप प्रज्वलित करून व वृक्षाच्या रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.याच कार्यक्रमात एन.एम. एस. एस.परीक्षेत यश संपादन केलेले साईनाथ केंद्रे,सार्थक महात्मे,यश मोतीवार व नंदनी मोतीवर या गुणवंत विद्यार्थ्यांचा माजी मंत्री बाळासाहेब जाधव व आ.बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. एम पी एस सी परीक्षेत उत्तीर्ण होवून मुंबई मंत्रालयात सेवेत दाखल झालेल्या नागेश परतवाड या माजी विदयार्थ्यांचा सत्कारही आ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण येमले यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मधुकर कांबळे यांनी केले.

या कार्यक्रमात विद्यालयातील जवळपास 70 च्या वर विद्यार्थ्यांनी मराठी,हिंदी गीताबरोबरच देश भक्तीपर गीत, बंजारा गीत, माता जिजाऊ,छत्रपती शिवाजी महाराज, ,ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले, माता रमाबाई आंबेडकर यांच्यावरील गीता बरोबरच समाज प्रबोधन गीतावर नृत्यविष्कार करून प्रेक्षकांची मने जिंकली .या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण येमले, नागनाथ आवाळे गजनवी सय्यद, रामदास टोंकाकोटे, जनार्दन फुले, राजेंद्र गोरटे,राजकुमार चेंडके, साहेबराव सुरवसे, माधव भिंगेवाड यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमास बोथी, बोथी तांडा, कलकोटी, शिरनाळ या गावातील रसिक मोठया संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??