आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उद्या पासून चाकूर तालुक्यात मराठा समाज व खुल्या प्रवर्ग समाजाचे सर्वेक्षण

सर्वेक्षणासाठी येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य ती खरी माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे - तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांचे आवाहन

चाकूर : 22 जानेवारी / मधुकर कांबळे
मराठा समाज व खुला प्रवर्ग समाजाचे सर्वेक्षण उद्या मंगळवार दि. 23 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत करण्यात येणार असून सर्वेक्षणासाठी घरी येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य ती खरी माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन चाकूरचे तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांनी केले आहे.
राज्यातील मराठा समाज व खुला प्रवर्ग समाजाचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिलेले आहेत. त्या अनुषंगाने काल सोमवार दि. 21 जानेवारी 2024 रोजी चाकूर येथील यशवंत मंगल कार्यालयात प्रगणक आणि पर्यवेक्षक यांचे तालुका स्तरीय प्रशिक्षण घेण्यात आले.जिल्हा पातळीवर प्रशिक्षण घेतलेल्या मास्टर ट्रेनर अविनाश पवार व प्रशांत तेरकर यांनी हे प्रशिक्षण दिले. यावेळी तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांनी उपस्थित पर्यवेक्षक आणि प्रगणक यांनी सर्वेक्षणाचे काम वेळेत आणि यशस्वीपणे पूर्ण करावे अशा सूचना दिल्या. तसेच तालुक्यातील सर्व नागरिकांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सहकार्य करावे असे आवाहन केले. या प्रशिक्षण कार्यक्रमाप्रसंगी चाकूर नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अजय नरळे,नायब तहसीलदार दिगंबर स्वामी, परिविक्षाधीन नायब तहसीलदार अक्षय म्हेत्रे यांच्या सह प्रगणक आणि पर्यवेक्षक उपस्थित होते.

सर्वेक्षणासाठी 444 प्रगणक 30 पर्यवेक्षक व 6 नोडल अधिकारी असून राखीव 18 प्रगणक व 5 पर्यवेक्षक असे एकूण 503 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??