आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रा.विशाल हौसे यांना अर्थशास्त्रात बौद्धिक संपदा अधिकार अंर्तगत भारत सरकारचे पेटंट प्राप्त

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव परिसरातील अर्थशास्त्र विषयातील पेटंट मिळविणारे हौसे पहिले प्राध्यापक, सर्व स्तरातून अभिनंदन

चाकूर:20 फेब्रुवारी / मधुकर कांबळे
चाकूर येथील सुपुत्र तथा जळगांव जिल्हातील चोपडा येथील महत्मा गांधी शिक्षण संस्थेचे डॉ.दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयात कार्यरत असलेले प्रा.विशाल हौसे यांना अर्थशास्त्रात बौद्धिक संपदा अधिकार अंर्तगत भारत सरकारचे पेटंट प्राप्त झाले आहे. त्यामुळे प्रा. हौसे यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
प्रा.विशाल हौसे हे डॉ.दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग प्रमुख म्हणून मागील 15 वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत 46 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंधाचे सादरीकरण केलेले आहे.कन्नूर विद्यापीठ,केरळ, जबलपूर, लखनऊ, प्रयागराज,वाराणसी,प्रतापगड (उ.प्र) इत्यादी याठिकाणी विविध विषयांवर साधन व्यक्ती म्हणून व्याख्याने दिलेली आहेत.ते मागील दोन वर्षांपासून क्रिप्टो करन्सी वरील संशोधन करीत होते. दोन वर्षाच्या अथक संशोधनात्मक परिश्रमातून अर्थशास्त्र विषयातील ” क्रिप्टो करन्सी अनालायझिंग डिवाइस ” या संशोधनासाठी भारत सरकार कडून बौद्धिक हक्क संपदा अधिकार अंतर्गत पेटंट प्राप्त झाले आहे . अभिमानाची बाब म्हणजे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव परिसरातील अर्थशास्त्र विषयातील पेटंट मिळविणारे ते पहिले प्राध्यापक ठरले आहेत.प्रा. हौसे हे आपल्या या यशाचे सर्व श्रेय त्यांची आई सौ.शोभा, वडील श्री पांडुरंग हौसे व परिवाराला देतात.ते चाकूर येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??