आपला जिल्हाकृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पत्रकार प्रशांत शेटे यांना राज्य शासनाचा कृषी विभागाचा पुरस्कार जाहीर

सर्व स्तरातून प्रशांत शेटे यांचे अभिनंदन

चाकूर : 23 फेब्रुवारी /मधुकर कांबळे
येथील दैनिक सकाळचे तालुका प्रतिनिधी प्रशांत शेटे यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणारा वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार जाहीर झाला असून लवकरच या पुरस्काराचे वितरण होणार आहे.हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शेटे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
चाकूर येथील दैनिक सकाळचे पत्रकार प्रशांत शेटे यांनी शेतीविषयक त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या विविध यशोगाथा व कृषी विभागाच्या विविध योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यम म्हणून योग्य भूमिका बजावल्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृषी मित्र पुरस्कार जाहिर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम एक लाख 25 हजार रुपये , सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे असून लवकरच मुंबई येथे एका विशेष कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल चाकूर अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील, तहसीलदार रेणुकास देवणीकर, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे, मुख्याधिकारी अजय नरळे, प्राचार्य डॉ. सर्जेराव शिंदे यांच्या सह चाकूरतील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवराकडून व तालुक्यातील सर्व पत्रकार संघटनेकडून अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??