आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थी स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षकांनी अधिकाधिक काम करावे – प्रा. डॉ.पराग खडके यांचे प्रतिपादन

चाकूर येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व भाई किशनराव देशमुख महाविद्यालय चाकूर आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने राज्यशास्त्र व भूगोल विषयाची विषयाच्या नवीन अभ्यासक्रमावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

चाकूर : 5 जुलै / मधुकर कांबळे
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे आपल्या देशातील तरुणांना वर्तमान आणि भविष्य याचा वेध घेण्यासाठी सक्षम बनवेल.वर्तमान काळात जी आव्हाने उभी राहतात त्याला तोंड देण्यासाठी त्यांची बौद्धिक क्षमता विकसित करणारे असेल. या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून रोजगार प्राप्त होईल ,मूल्यशिक्षण मिळेल, लेखन कौशल्याचा विकास होईल म्हणजेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणारा नवीन अभ्यासक्रम असून यासाठी शिक्षकांनी अधिकाधिक काम करण्याची तयारी ठेवावी.असे प्रतिपादन नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मानव विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग खडके यांनी केले.
चाकूर येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व भाई किशनराव देशमुख महाविद्यालय चाकूर आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने राज्यशास्त्र व भूगोल विषयाची विषयाच्या नवीन अभ्यासक्रमावर एक दिवसीय कार्यशाळा 4 जुलै 2024 रोजी घेण्यात आली त्याप्रसंगी डॉ. खडके बोलत होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी लोकायत शिक्षण संस्थेचे सचिव ॲड. पी .डी . कदम हे उपस्थित होते . तर या कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा सीमा देशमुख यांच्या हस्ते झाले करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तथा राजर्षी शाहू महाविद्यालय लातूरचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे , संस्थेचे सहसचिव बाबासाहेब देशमुख ,राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. रत्नाकर लक्षट्टे,भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. आप्पाराव काळगापुरे, कार्यशाळेचे संयोजक प्राचार्य डॉ. सर्जेराव शिंदे ,भूगोल विभाग प्रमुख डॉ.जनार्दन वाघमारे , राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दत्तात्रय वाघुले , समितीचे सदस्य रामभाऊ जाधव उपस्थित होते.
कार्यशाळेच्या उद्घाटक तथा संस्थेच्या अध्यक्षा सीमा देशमुख आपल्या भाषणात म्हणाल्या की उत्तम व कार्यकुशल विद्यार्थी घडविणे हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे फलित आहे.विद्यापीठाची पहिली कार्यशाळा आमच्या महाविद्यालयात होत आहे हे आमच्या संस्थेसाठी अभिमानाची व आनंदाची बाब असल्याचे मत देशमुख यांनी व्यक्त केले.प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सर्जेराव शिंदे यांनी महाविद्यालयाचा परिचय आणि कार्यशाळेची भूमिका मांडली.याप्रसंगी प्राचार्य डॉ.महादेव गव्हाणे यांनी ही आपले विचार मांडताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम तयार झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करताना अनेक अडचणी येतील.त्या अडचणीवर मात करून आपणास असा शैक्षणिक बदल स्विकारावाच लागेल असे विचार व्यक्त केले.राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ रत्नाकर लक्षट्टे यांनी राज्यशास्त्र अभ्यासक्रमाची रचना सांगून मार्गदर्शन केले तर भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. आप्पाराव काळगापुरे यांनी भूगोल हा विषयाची रचना व भूमिका विशद करून नवीन राष्ट्रीय धोरण अंतर विद्याशाखीय कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेसाठी उपयुक्त असून आता आपणास प्रयोगशील पणे काम करावे लागणार असल्याचे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वामी रामानंद तीर्थ आणि भाई किशनराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रगीत आणि राज्यगीताने कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली.या कार्यशाळेसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या नांदेड , हिंगोली ,परभणी , लातूर या चार जिल्ह्यामधून जवळपास 125 प्राध्यापक उपस्थित होते.दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत वेगवेगळ्या चर्चा झाल्या आणि यातून राज्यशास्त्र आणि भूगोल विषयाच्या प्राध्यापकांना अध्यापन करण्यासाठी मार्गदर्शन लाभले अशा प्रतिक्रिया सहभागी प्राध्यापकांनी मांडल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.डॉ.राजेश तगडपल्लेवार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.राजेश विभुते यांनी केले.
या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील आयक्यूएसीचे समन्वयक डॉ.एम.एम.बिदरे, डॉ. नामदेव गौंड, डॉ.नागोरावआसोले , प्रा.माधवी धडे , डॉ.सुरेखा खडके डॉ. भारत लासुरे , डॉ. पी .एस. देशमुख ,डॉ. बी. डी .पवार , प्रा.मल्हारी जक्कलवाड, प्रा. पल्लवी धनुरे , डॉ .अशोक पुदाले , डॉ. रमेश साळी,डॉ.शिवानंद गिरी ,प्रा. बी. एस.मानखेडकर ,प्रा.एम.टी.माळवदकर, डॉ. एस.टी. जाधव , डॉ. एस . एस .जाधव, डॉ.आर.डी .जाधव, प्रा. व्यंकटेश माने ,कार्यालयीन अधीक्षक ज्ञानोबा येमले , आकाश पाडुळे,बालाजी सूर्यवंशी, महादेव स्वामी ,मोहनराव साळुंखे यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??