आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पार्वतीबाई पाटील यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

चाकूर : 16 ऑगस्ट /प्रतिनिधी
चाकूर येथील पोलीस पाटील कै. बापूराव बाबाराव पाटील यांच्या पत्नी पार्वतीबाई बापूराव पाटील यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
पार्वतीबाई पाटील यांचे शुक्रवार दि.16 ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्या 84 वर्षाच्या होत्या.त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी एक वाजता पाटील स्मशानभूमीत (बारव ) येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी चाकूर व परिसरातील विविध क्षेत्रातील प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते.त्यांच्या मृत्यूने चाकूर व परिसरात शोक व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार असून दिलीप पाटील यांच्या आई व पुण्यनगरीचे पत्रकार विनोद निला यांच्या त्या आजी होत.


