भारत देशाला एकसुत्रात गुंफण्याची क्षमता हिंदी भाषेत – प्रा. राजेश विभुते यांचे प्रतिपादन

चाकूर : 15 सप्टेंबर /मधुकर कांबळे
हिंदी ही विश्वातली तिसरी महत्वपूर्ण भाषा असून भारत देशाला एकसुत्रात गुंफण्याची क्षमता हिंदी भाषेत आहे असे प्रतिपादन प्रा. राजेश विभुते यांनी केले.
येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयात हिंदी विभागाच्यावतीने 14 सप्टेंबर या हिंदी दिवसानिमित्त हिंदी साहित्य मंडळांचे उद्घाटन हिंदी विभाग प्रमुख प्रा.राजेश विभुते यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी प्रा.बबिता मानखेडकर,प्रा.पल्लवी धनुरे,साहित्य मंडळ अध्यक्षा शपाबी बागवान,सहसचिव रजत भोळे आदिजण उपस्थित होते.
आपल्या भाषणात पुढे बोलताना प्रा. विभुते म्हणाले की आज हिंदी ही रोजगाराची भाषा बनली असून विद्यार्थांनी हिंदी साहित्य व रोजगारभिमुख हिंदीच्या संधी पाहून हिंदी भाषेचे ज्ञान आत्मसात केले पाहिजे..
कार्यक्रमाच्या प्रारंभी संत कबीर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.प्रा.बबिता मानखेडकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.या प्रसंगी साहित्य मंडळाच्या पदाधिकारी रितिका पाटील,करीना वाघमारे,रेश्मा केंद्रे,अक्षता गंदगे,दत्ता कांबळे यांचा गुलाबपुष्प देऊन व पोष्टर प्रदर्शन मध्ये प्रथम आलेल्या शबापी बागवान,द्वितीय समीर पठाण यांचा प्रमाणपत्र व ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला .तसेच बी.ए. तृतीय वर्षाचा विद्यार्थी सोहेल दापकेवाले याची रायगड येथे पोलीस भरती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. शपाबी बागवान या विद्यार्थिनीने हिंदी दिवसाचे महत्व या विषयावर आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे आभार प्रा. पल्लवी धनुरे यांनी व्यक्त केले .


