जीपॅट व विद्यापीठ परीक्षेत डी.बी.महाविद्यालयाचे घवघवीत यश
जीपॅट राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत वैष्णवी शेटे व जगदीश स्वामी यांनी केली पात्रता संपादन.

चाकूर : 23 ऑगस्ट /मधुकर कांबळे
तालुक्यातील महाळंग्रा येथील दिनेश बेंबडे कॉलेज ऑफ फार्मसी मधील विद्यार्थ्यांनी जीपॅट सारख्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत आणि विद्यापीठीय परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून जीपॅट राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत वैष्णवी राजकुमार शेटे व जगदीश मल्लीकार्जून स्वामी यांनी पात्रता संपादन केली असून विद्यापीठीय परीक्षेत शिवराज सुधाकर पवार व राज अजय मोरे यांनी प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.त्यामुळे या सर्व यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या उदात्त हेतूने डी.बी.फार्मसी कॉलेजची स्थापना करण्यात आली असून आजतागायत अनेक यशस्वी विद्यार्थी घडविण्याचे काम या संस्थेने केले आहे.
बी.फार्मसी अभ्यासक्रमातील एकूण 113 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते.त्यापैकी 106 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.त्यामध्ये गुणानुक्रमे शिवराज सुधाकर पवार व राज अजय मोरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.तर रविना ज्ञानदेव टेळे हिने द्वितीय क्रमांक मिळवला असून तृतीय क्रमांक येण्याचा मान वैभव वैजनाथ नाईकनवरे,अभिषेक विजयकुमार चौंडे, मानसी हणमंत देशमुख यांनी मिळवला आहे.बी.फार्मसी शाखेचा निकाल 94 % लागला आहे.या यशामुळे डी.बी.कॉलेज ऑफ फार्मसीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
विद्यार्थ्यांनी संपादन केलेल्या यशाबद्दल राधेय चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दिनेश बेंबडे,सचिव प्रणिता बेंबडे,कार्याध्यक्ष विवेक बेंबडे, प्राचार्य डॉ.जयदीप यादव,प्राचार्य डॉ.श्रीकांत ढगे,प्रशासकीय अधिकारी प्रा.श्रीहरी वेदपाठक,तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.


