पाल्यांच्या अभ्यासात शिक्षकांबरोबरच पालकांचेही योगदान महत्वाचे – पत्रकार के. आर. वाघमारे यांचे प्रतिपादन

चाकूर : 9 सप्टेंबर /मधुकर कांबळे
प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षक विविध उपक्रमाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देत असतात.शिक्षण प्रक्रियेत शिक्षकांबरोबरच पालकांची भूमिका महत्वपूर्ण असते.आपल्या पाल्यांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर पाल्यांच्या अभ्यासात शिक्षकांबरोबरच पालकांचेही योगदान महत्वाचे आहे. असे मौलिक प्रतिपादन माजी मुख्याध्यापक तथा जेष्ठ पत्रकार के.आर.वाघमारे यांनी पालक मेळाव्यात बोलताना केले.
चाकूर तालुक्यातील झरी (खुर्द) येथील जिल्हा परिषद शाळेत 5 सप्टेंबर 2024 रोजी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी वाघमारे यांनी ‘पाल्यांच्या अभ्यासात पालकांची भूमिका’ या विषयाच्या अनुसंगाने उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच गणेश सूर्यवंशी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक बाबासाहेब सूर्यवंशी, माजी प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे,माजी मुख्याध्यापक शिवराज सूर्यवंशी,दशरथ सूर्यवंशी,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रविकांत खुंटेवाड उपस्थित होते.
या मेळाव्यात ब्राईट फ्युचर ऑर्गनायझेशन फॉर द ब्लाईन्ड संस्था मुंबई अंतर्गत ब्लाईन्ड युनिटी फॉर सेल्फ सफिसिएनसी (बस ) या दिव्यांग संस्थेच्या वतीने के.आर.वाघमारे यांच्या व्यवस्थापनाखाली झरी ( खुर्द ) गावातील अंध पालकांच्या रुपाली समुखराव, गौरव समुखराव,सुमीत सूर्यवंशी,शिवनाथ निडगुणे या विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी शैक्षणिक साहित्यांचे किट्स वाटप करण्यात आले. तसेच शाळेतून विविध उपक्रमामध्ये सहभाग नोंदवून इयत्ता पहिली ते सातवी वर्गातून गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचाही शाळेच्या वतीने सत्कारही करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुण्यांचेही मार्गदर्शनपर भाषणे झाली. शाळेच्या विकासात ग्रामस्थांचा सहभाग म्हणून माजी मुख्याध्यापक बाबासाहेब सूर्यवंशी,सरपंच गणेश सूर्यवंशी,माजी प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे,माजी मुख्याध्यापक शिवराज सूर्यवंशी, दशरथ सूर्यवंशी, दत्तात्रय सूर्यवंशी,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रविकांत खुंटेवाड यांनी शाळेतील प्रत्येक वर्गात एक पंखा देण्याचे जाहीर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविकांत खुंटेवाड यांनी केले. सूत्रसंचालन ईश्वर सांगवे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार चंद्रकांत पवार यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेचे मुख्याध्यापक शिवलिंग खपले, सहशिक्षक बाळासाहेब जाधव,बाबुराव चव्हाण,संजय बट्टावार, रेश्मा शेख, सुनीता स्वामी,प्रल्हाद सूर्यवंशी,शोभा समुखराव,हिरालाल सूर्यवंशी,अंगद सूर्यवंशी,दत्तात्रय सूर्यवंशी,जिलानी शेख,धिरज जोगदंड, संतोष खताळ,ब्रह्मानंद स्वामी,महेश समुखराव, धर्मराज सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.


