उद्यापासून चाकूरात सहकार महर्षी बाळासाहेब जाधव फाउंडेशन च्यावतीने भव्य डे-नाईट क्रिकेट स्पर्धा

चाकूर : 31मे / मधुकर कांबळे
सहकार महर्षी बाळासाहेब जाधव फाउंडेशनच्यावतीने चाकूर येथे साई नंदनवनम समोरील मैदानावर उद्यापासून भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे उदघाटन चाकूर अहमदपूर तालुक्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते शनिवार दि.1 जून 2024 रोजी सायंकाळी 5 वा करण्यात येणार आहे.
या स्पर्धेत प्रथम विजेत्या संघास एक लाख एक हजार 111रुपये , उपविजेत्या संघास 51हजार 111 रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे.त्याचबरोबर पब्लिकसाठी लकी ड्रा म्हणून माजी नगरसेवक इलियास सय्यद यांच्यावतीने स्पोर्ट सायकल, नगरसेवक मुज्जमील सय्यद यांच्यावतीने उत्कृष्ट फलंदाजसाठी स्पोर्ट सायकल, उत्कृष्ट गोलंदाजसाठी राष्ट्रवादीचे युवा नेते जाफर सय्यद यांच्यावतीने स्पोर्ट सायकल, राष्ट्रवादी सेवा दलाचे तालुकाध्यक्ष शिवदर्शन स्वामी यांच्या वतीने मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट सायकल, फायनल मॅन ऑफ द मॅच साठी राष्ट्रवादीचे नेते प्रा. डॉ. बी. डी. पवार यांच्या वतीने स्पोर्ट सायकल, तर महालक्ष्मी मोबाईल चाकूरच्यावतीने उत्कृष्ट समलोचकसाठी स्पोर्ट सायकल बक्षीस देण्यात येणार आहेत.स्पर्धेची सर्व जय्यत तयारी करण्यात आली आहे.
तरी या उदघाटन कार्यक्रमास व दररोज होणारे सामने पाहण्यासाठी क्रीडाप्रेमिनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन स्पर्धा संयोजक बिलालखा पठाण,मोईन गुळवे,मुद्दसिर सय्यद यांनी केले आहे.


