आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सहकार मंत्री ना . बाबासाहेब पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाला 25 कोटींचा निधी मंजूर

चाकूर : 8 मार्च (मधुकर कांबळे )
महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे नुकत्याच पारित झालेल्या अर्थसंकल्पात अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघातील विविध रस्त्यांसाठी 25 कोटी रुपयांचा भरीव निधी राज्य सरकारने मंजूर केला असून लवकरच या निधीची सर्व प्रशासकीय मान्यता पूर्ण होऊन ही रस्त्याची कामे मार्गी लागणार असल्याची माहिती सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.
यामध्ये प्रामुख्याने चाकूर तालुक्यातील उजळंब,येरोळ, साकोळ आनंदवाडी या रस्त्यासाठी तब्बल 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच मुरंबी,सुगाव ते देवांग्रा ,नळेगाव ते राज्य क्रमांक 240 या रस्त्यासाठी 8 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. धानोरा, सताळा , महाळगी , जाणवळ , शिवणखेड ,ममदापूर बोरी, बिंदगहाळ,बोकनगाव, मुगाव या रस्त्यासाठी 7 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अहमदपूर शहरातील थोडगा रोड या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तब्बल 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
रस्ते विकास कामासाठी निधी सरकारने मंजूर केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सहकार मंत्री ना . बाबासाहेब पाटील यांनी आभार मानले आहेत.

मतदारसंघातील जनतेच्या मागणीनुसार अर्थसंकल्पात मतदारसंघातील विविध रस्त्यासाठी 25 कोटी रुपये शासनाच्या वतीने मंजूर करण्यात आली असून लवकरच ही कामे मार्गी लागणार आहेत यामुळे दळणवळणाची सुविधा अधिक सुलभ होणार आहे.
==================
ना.बाबासाहेब पाटील
सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??