चाकूर नगरपंचायतीच्या विषय समिती सभापती निवडी बिनविरोध, विरोधी गटाकडे तीन समित्या

चाकूर : 13 फेब्रुवारी / मधुकर कांबळे
चाकूर नगरपंचायतीच्या विविध विषय समिती सभापतीच्या निवडी बिनविरोध झाल्या असून विरोधी गटाने तीन समित्या मिळवीत सभापती निवडीत आपले वर्चस्व निर्माण केले आहे.
चाकूर नगर पंचायतीच्या सभागृहात गुरुवार दि.13 फेब्रुवारी 2025 रोजी सभापती निवडीसाठी पिठासीन अधिकारी म्हणून अहमदपूरच्या उपविभागीय अधिकारी मंजूषा लटपटे यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या सभापती पदाच्या निवडी करण्यात आल्या.यावेळी नगरपंचायतचे मुख्याधिकारी प्रतिक लंबे उपस्थित होते.प्रत्येक समिती सभापती पदासाठी प्रत्येकी एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यामुळे पिठासीन अधिकारी लटपटे यांनी सर्व सभापतीच्या निवडी बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.त्यात बांधकाम सभापती म्हणून मुज्जमील मुस्तफा सय्यद, पाणीपुरवठा सभापती गोदावरी राजकुमार पाटील, महिला व बाल कल्याण सभापती शुभांगी रामेश्वर कसबे,स्वछता व आरोग्य सभापती म्हणून शाहीनबानू महंमद सय्यद यांची निवड झाली आहे.तर पदसिद्ध सभापती म्हणून उपनगराध्यक्ष अरविंद बिराजदार यांची नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी निवड करण्यात आली.
यावेळी सभागृहात नगराध्यक्ष कपील माकणे,उपनगराध्यक्ष अरविंद बिरादार, गटनेते करीमसाहेब गुळवे,गटनेत्या हिरकणबाई लाटे, माजी नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे,नगरसेवक विलासराव पाटील, भागवत फुले ,अभिमन्यू धोंडगे,साईप्रसाद हिप्पाळे,नितीन रेड्डी,नगरसेविका शबाना सय्यद ,ज्योती स्वामी,गंगुबाई गोलावार, सुजाता रेड्डी, वैशाली कांबळे यांची उपस्थिती होती.गटनेते करीमसाहेब गुळवे यांच्या दालनात सर्व नूतन सभापतींचा सत्कार करण्यात आला.


