चाकूर तालुका पत्रकार मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी संतोष आचवले तर सचिवपदी नितीन कुलकर्णी यांची बिनविरोध निवड

चाकूर : 16 ऑगस्ट /मधुकर कांबळे
चाकूर तालुका पत्रकार मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी संतोष आचवले यांची तर सचिवपदी नितीन कुलकर्णी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
चाकूर तालुका पत्रकार मित्र मंडळाच्या अध्यक्ष आणि सचिवाच्या निवडी संदर्भात गुरुवार दि.15 ऑगस्ट 2024 रोजी चाकूर येथील मित्र मंडळाच्या कार्यालयात मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संदीप अंकलकोटे यांच्या अध्यक्षतेखाली तर संस्थापक सचिव निरंजन रेड्डी यांच्या उपस्थितीत मंडळाच्या सर्व सदस्यांची एक विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत सविस्तर चर्चा करून पत्रकार मित्र मंडळाच्या तालुका अध्यक्षपदी दैनिक सकाळचे वडवळ नागनाथ येथील पत्रकार संतोष आचवले यांची तर सचिवपदी दैनिक सामनाचे चापोली येथील पत्रकार नितीन कुलकर्णी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.सदरील निवड ही दोन वर्षासाठी करण्यात आली आहे.
यावेळी नुतन अध्यक्ष आचवले व सचिव कुलकर्णी यांचा अंकलकोटे व रेड्डी यांनी सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकार भरतसिंह ठाकूर, ओमप्रकाश लोया, मधुकर कांबळे, संग्राम होनराव, वैभव रेकुळगे, सलीम तांबोळी, यादव करडीले, धर्मराज साबदे, नवनाथ डिगोळे, शिवशंकर होनराव, मंगेश आडे यांच्यासह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.उर्वरित कार्यकारणी पुढील आठवड्यात जाहीर केली जाणार आहे.


