चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव उत्कृष्ट तहसीलदार म्हणून सन्माननीत

चाकूर : 16 ऑगस्ट /मधुकर कांबळे
चाकूर तालुक्याचे तहसीलदार नरसिंग जाधव यांना उत्कृष्ट तहसीलदार म्हणून राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना.संजय बनसोडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 1915 अनुषंगाने तहसीलदार नरसिंग जाधव यांनी 2023 – 2024 या वर्षांमध्ये उल्लेखनीय व प्रशंसनिय कामगिरी केल्याबद्दल लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्ट 2024 रोजी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना.संजय बनसोडे यांच्या हस्ते तहसीलदार जाधव यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी संगीता टकले, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे, भारत कदम, अहिल्या गाठाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सलीम शेख, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, जावेद शेख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे, जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, पत्रकार, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.


