शिरूर ताजबंद येथील वसंतराव नाईक अध्यापक महाविद्यालयाला नॅकचा “बी” दर्जा

चाकूर : 15 ऑगस्ट /मधुकर कांबळे
अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील वसंतराव नाईक अध्यापक महाविद्यालयाला ( बी.एड.) नॅकचा “बी” दर्जा मिळाला असून यामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. पाटील,सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन संस्थेचे पदाधिकारी व पालकांनी केले आहे.
महाविद्यालयाची गुणवत्ता टिकून रहावी म्हणून महाविद्यालयाचे मूल्यांकन नॅक समितीकडून केले जाते. दि.22 व 23 जुलै 2024 या दोन दिवशी नॅक समितीकडून आलेल्या त्रिसदसीय समितीकडून महाविद्यालयाचे मूल्यांकन करण्यात आले होते. या समितीचे अध्यक्ष ओरिसा राज्यातील संबलपुर येथील जी.एम.विद्यापीठाचे कुलगुरू नागापल्ली नागाराजू , समन्वयक म्हणून एम.इस्लामिया विद्यापीठ दिल्ली येथील शिक्षण शास्त्र विभागाचे प्रोफेसर करतार सिंग तर सदस्य म्हणून त्रिपुरा राज्यातील आगरताळा येथील एम.बी.बी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंभुनाथ रक्षित हे होते.
या समितीने महाविद्यालयाची दोन दिवस तपासणी करून समाधान व्यक्त केले.त्यांच्या शिफारशीवरून 12 ऑगस्ट 2024 रोजी नॅक समितीने “बी” दर्जा बहाल केला आहे. महाविद्यालयाच्या या गुणात्मक यशामुळे संस्थेचे अध्यक्ष माजीमंत्री बाळासाहेब जाधव, चाकूर अहमदपूर तालुक्याचे आमदार तथा संस्थेचे सचिव बाबासाहेब पाटील, उपाध्यक्षा दिपाली जाधव, सहसचिव बळीराम भिंगोले, सहसचिव अविनाश जाधव, ज्येष्ठ संचालक साहेबराव जाधव, कोषाध्यक्ष अंकुशराव कानवटे, संचालिका कुमुदिनी जाधव, संचालक तथा शिरूर ग्रामपंचायतचे उपसरपंच सुरज पाटील,या सर्वांनी तसेच माजी विद्यार्थी संघटना, पालक यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.एस. पाटील, समन्वयक प्रा. डॉ. एच. एस.पुजदेकर प्रा. डॉ. व्ही..के. कदम, प्रा.आर. जी. वाघमारे, प्रा.व्ही..एस. बिरादार प्रा. अनुराधा कामठाणे, ग्रंथपाल एल.बी. सूर्यवंशी, शिक्षकेतर कर्मचारी बालाजी गोरे, अनुराधा पवार, नागनाथ मदनुरे, दस्तगीर तांबोळी, सायराबी सय्यद या सर्वांचे अभिनंदन केले आहे.


