प्राचार्य डॉ. श्रीरंग खिल्लारे यांचा आज सेवापूर्ती गौरव सोहळा

चाकूर : 4 ऑगस्ट /मधुकर कांबळे
अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे माजी सिनेट सदस्य प्राचार्य डॉ. श्रीरंग खिल्लारे हे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांचा आज 4 ऑगस्ट 2024 रोज रविवारी सकाळी 11 वाजता अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सानवी मंगल कार्यालय अहमदपूर येथे सेवापुर्ती गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे..
सेवापुर्ती गौरव सोहळा या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी मंत्री बाळासाहेब जाधव हे भूषविणार असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध विचारवंत डॉ.सुरेश वाघमारे,जामकर महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंतराव भोसले,रिपाइंचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे हे उपस्थित राहणार आहेत..
या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने प्रा.डॉ.नारायण कांबळे,बा.ह.वाघमारे ,प्रा.गोविंद शेळके,प्रा.डॉ.उद्धव सोनुले,प्रा.डी.बी.शिंदे ,प्रा.द.मा.माने,मोहीब कादरी,प्रा.डॉ.विलास कांबळे, तानाजी साने, बालाजी तुरेवाले,धनंजय उजनकर,विलास चापोलीकर, प्रभाकर कांबळे,प्रा.बालाजी आचार्य,प्रा.डॉ गौतम बनसोडे,प्रा.डॉ.बालाजी गव्हाळे,प्रा.डॉ.गोविंद कलवले आदींनी केले आहे.


