आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र
नळेगाव येथील जेष्ठ पत्रकार शिवाजी बरचे यांचे अल्पशा आजाराने निधन, उद्या अंत्यसंस्कार

चाकूर : 3 ऑगस्ट /प्रतिनिधी
चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील रहिवासी, जेष्ठ पत्रकार शिवाजी रघुनाथ बरचे यांचे अल्पशा आजाराने आज शनिवार दि.3 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी निधन झाले आहे.मृत्यू समयी ते 65 वर्षाचे होते.उद्या रविवारी सकाळी 10 वाजता नळेगाव येथील सार्वजनिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले ,सुना,नातवंडे असा परीवार असून .त्यांनी जवळपास २० वर्षे पत्रकार क्षेत्रात पत्रकार म्हणून काम केले आहे.शांत, संयमी व अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांना ओळखले जात असे. हल्लाबोल परिवाराच्या वतीने स्व.बरचे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.


