आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जुगाराच्या अड्डयावरून दोन कोटी 28 लाखाचा मुद्देमाल जप्त, सहाय्यक पोलीस अधिक्षक बी.चंद्रकांत रेड्डी यांच्या पथकाची धाडसी कारवाई

चाकूर : 15 मे / मधुकर कांबळे
तांबळा शिवारातील जुगाराच्या अड्डयावर चाकूर पोलीसांनी अचानक धाड टाकून तब्बल दोन कोटी 28 लाख 73 हजार 410 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी 74 आरोपी विरोधात धडक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांनी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधिना दिली.
शनिवार दि. 11 मे 2024 रोजी सहाय्य्क पोलीस अधिक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांना गुप्त बातमीदारामार्फत तांबळा शेत शिवारात एका जुगाराच्या क्लबमध्ये नेमून दिलेल्या वेळे पेक्षा जास्त वेळ काही लोक जुगार खेळत व खेळवित आहेत अशी गुप्त बातमी मिळाल्याने रेड्डी यांनी सदरची माहिती लातूरचे पोलीस अधिक्षक सोमय मुंडे व अप्पर पोलीस अधिक्षक अजय देवरे यांना कळविली. पोलीस अधिक्षक मुंडे व अप्पर पोलीस अधिक्षक देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांनी तात्काळ दोन पोलीस अधिकाऱ्यांसह सात पोलीस कर्मचारी यांचे एक पथक बनवले .या पथकाने साध्या वेशात मध्यरात्री उशिरा सव्वा एक वाजण्याच्या सुमारास दोन पंचासह जुगार अड्डयावर छापा टाकला असता नेमुन दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ जुगार खेळत व खेळवीत असल्याचे आढळून आले.यावेळी रोख रक्कम 6,00,150/-रू, 29 चारचाकी गाड्या अंदाजे किंमत 2,19,00000/-रू, 3,73,260/- रु किंमतीचे मोबाईल फोन असा एकूण 2 कोटी 28 हजार 73 लाख 410 रुपयाचा मु‌द्देमाल जप्त करण्यात आला असून 74 जणावर कारवाई करण्यात आली आहे.
या धाडसी पोलीस कारवाई पथकामध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या समवेत पोलीस उपनिरीक्षक दिलीप मोरे, पोलीस उपनिरीक्षक एच.एस. चिरमाडे,पोलीस अंमलदार एस. व्ही.गुंडरे, एस.डी.धडे,आर.पी. रायभोळे,पी.एल कांबळे,एन.एस. मामडगे, ए. एस. कातपुरे, एस.पी.आरदवाड यांचा समावेश होता.
पोलीस उपनिरीक्षक एच.एस. चिरमाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन औराद येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास औरादचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक दुरपडे हे करीत आहेत.

अवैध धंद्याना आळा घालणार – सहाय्यक पोलीस अधिक्षक बी.चंद्रकांत रेड्डी

समाजात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्यासाठी अवैध धंदे कारणीभूत ठरत असुन हे रोखण्यासाठी चाकूर उपविभागात येणाऱ्या चाकूर, रेणापुर व शिरुर अनंतपाळ या तिन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व अवैध धंदे कायमचे बंद केले जाणार असून जनता व पोलीस यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगून चाकूर उपविभागीय हद्दीत अवैध धंदे होताना निदर्शनास आल्यास थेट जनतेने माझ्याशी संपर्क करुन माहिती द्यावी असे आवाहन IPS रेड्डी यांनी केले.आपल्या भागातील अवैध धंद्याची माहिती पोलीसांना दिल्यानंतर त्यावर योग्य कारवाई केली जाईल.उपविभागात येणाऱ्या प्रत्येक शहर आणि गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याला प्राधान्य राहणार असून यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.माझ्या कार्य क्षेत्रात येणाऱ्या सर्व तालुक्यातील अवैध धंद्यांना आळा घातला जाईल असेही सहाय्यक पोलीस अधिक्षक बी.चंद्रकांत रेड्डी यांनी पत्रकारांशी सवांद साधताना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??