खेळातून सांघिक भावना जोपासली जाते – आ. बाबासाहेब पाटील
चाकूरात सहकार महर्षी बाळासाहेब जाधव फाउंडेशनच्या डे - नाईट क्रिकेट स्पर्धेचा आ. पाटील यांच्या हस्ते शानदार शुभारंभ

चाकूर : 2 जून /मधुकर कांबळे
खेळात जय पराजय महत्वाचा नसतो तर खेळाडू संघासाठी आपल्या खेळाचे कशा पद्धतीने प्रदर्शन करतो हे महत्वाचे असते.खेळामुळे शारीरिक स्वास्थ चांगले राहत असल्यामुळे शरीर निरोगी बनते असे सांगून खेळातून खऱ्या अर्थाने सांघिक भावना जोपासली जाते.त्यामुळे एकात्मता वाढीस लागते असे मौलिक प्रतिपादन चाकूर अहमदपूर तालुक्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले.
सहकार महर्षी बाळासाहेब जाधव फाउंडेशनच्यावतीने चाकूर येथील साई नंदनवन समोरील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या डे – नाईट क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी उदघाटक म्हणून ते बोलत होते.यावेळी आ. पाटील यांनी स्पर्धेत सहभागी सर्व संघांचे स्वागत करून खेळासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी मंत्री बाळासाहेब जाधव , कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष विलासराव पाटील चाकूरकर, नगराध्यक्ष कपिल माकणे, उपाध्यक्ष अरविंद बिरादार,जिल्हा नियोजन समिती सदस्य पद्माकरराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते बालाजीराव सूर्यवंशी, नगर पंचायतचे बांधकाम सभापती मिलिंद महालिंगे, माजी जि.प. सदस्य दयानंद सुरवसे, भानुदासराव पोटे,राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन मद्रेवार,सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू तिकटे, तालुकाध्यक्ष विश्वनाथ एडके,शहराध्यक्ष शिवशंकर हाळे, राष्ट्रवादी शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष प्रा.दयानंद झांबरे , नगरसेवक मुज्जमिल सय्यद, माजी नगरसेवक इलियास सय्यद, राम कसबे, संजय पाटील, सिद्धेश्वरअप्पा अंकलकोटे,गणपत कवठे, हणमंतराव लवटे, प्रा. डॉ. बी. डी. पवार,युनूस सय्यद, सूरज पटणे,जगनाथ आयनुले, विष्णुकांत खेरडे,विवेक शिंदे, ॲड. श्रीनाथ सावंत, नागेश बेरुळे,माऊली कासले, आय.डी. शेख, अनिल वाडकर, शशिकांत शिंदे, भुजंगराव शिंदे, संदीप शेटे,आदित्य लवटे, समाधान जाधव, अविनाश भोरे, गजानन होनराव, धनराज पाटील, मतीन गुळवे, सचिन तोरे, ओम केंद्रे, चेतन महालिंगे, दिलीप जाधव, कासिम पटेल यांच्यासह खेळाडू, प्रेक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित सौदागर यांनी केले तर प्रास्ताविक व आभारप्रदर्शन बिलाल पठाण यांनी केले.
या स्पर्धेसाठी 14 संघ सहभागी झाले असून स्पर्धेत प्रथम विजेत्या संघास एक लाख एक हजार 111रुपये , उपविजेत्या संघास 51हजार 111 रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे.त्याचबरोबर पब्लिकसाठी लकी ड्रा म्हणून माजी नगरसेवक इलियास सय्यद यांच्यावतीने स्पोर्ट सायकल, नगरसेवक मुज्जमील सय्यद यांच्यावतीने उत्कृष्ट फलंदाजसाठी स्पोर्ट सायकल, उत्कृष्ट गोलंदाजसाठी राष्ट्रवादीचे युवा नेते जाफर सय्यद यांच्यावतीने स्पोर्ट सायकल, राष्ट्रवादी सेवा दलाचे तालुकाध्यक्ष शिवदर्शन स्वामी यांच्या वतीने मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट सायकल, फायनल मॅन ऑफ द मॅच साठी राष्ट्रवादीचे नेते प्रा. डॉ. बी. डी. पवार यांच्या वतीने स्पोर्ट सायकल, तर महालक्ष्मी मोबाईल चाकूरच्यावतीने उत्कृष्ट समलोचकसाठी स्पोर्ट सायकल बक्षीस देण्यात येणार आहेत.


