चाकूर शहरात उघड्यावर गोवंशाची कत्तल करणाऱ्या दहा जणाविरूध्द गुन्हा दाखल, 2 लाख 47 हजारांचा मुद्देमाल जप्त

चाकूर : 2 जून /मधुकर कांबळे
चाकूर शहरात उघड्यावर गोवंशाची कत्तल केल्याप्रकरणी शुक्रवार दि. 31 मे 2024 रोजी दहा जणाविरूध्द चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की शहरातील आर. बी. पाटील नगर या भागात उघड्यावर गोवंशाची कत्तल होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यावरून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक राजेश घाडगे, होनाजी चिरमाडे, पोलीस कर्मचारी गुंडरे, मरपल्ले, कांबळे,धडे, गाडेकर, शिंदे आरदवाड,रायबोळे यांनी शुक्रवारी पहाटे चार वाजता या भागात छापा टाकला.यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी उघडयावर बसून गोवंशाची कत्तल केली जात असल्याचे दिसून आले. तसेच काही गोवंशी कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवल्याचे आठळून आले. यावेळी त्यांच्याकडून दोन लाख ४७ हजार आठशे रूपयाचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक चिरमाडे यांच्या तक्रारीवरून अजमत सत्तार कुरेशी, रौफ जमाल कुरेशी,सलीम जमाल कुरेशी, तजमुल सत्तार कुरेशी, सत्तार मोहमद कुरेशी, अजहर मस्जीद कुरेशी, खालीद अन्वर कुरेशी, दाऊद अन्वर कुरेशी, अयुब जहुर कुरेशी, नयुम अयुब कुरेशी यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. चाकूर पोलीसांची मोठी कारवाई गोवंशाची कत्तल करणाऱ्या दहा आरोपी ताब्यात गुन्हा दाखल आरोपीना अटक करण्यात आली आहे.


