चाकूर तालुक्याचा दहावी बोर्ड परीक्षा निकाल 95.87 टक्के, जगत जागृतीचे तीन विद्यार्थी अव्वलस्थानी

चाकूर : 27 मे / मधुकर कांबळे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावीचा निकाल आज सोमवार दि.27 मे 2024 रोजी जाहीर झाला असून चाकूर तालुक्याचा निकाल 95.87 टक्के इतका लागला आहे.तालुक्यातील अनेक शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून जगत जागृती विद्यालयातील तीन विद्यार्थी अव्वल स्थानी राहिले आहेत.

कु.अंकिता विष्णू शिंदे

कु.संस्कृती संगमेश्वर पाटील

ओमकार राजकुमार धोंडगे
या विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 टक्के गुण घेऊन तालुक्यात प्रथम येण्याचा संयुक्तरित्या मान मिळविला असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.यामध्ये अंकिता विष्णू शिंदे, संस्कृती संगमेश्वर पाटील व ओमकार राजकुमार धोंडगे या गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

शाळेचे नाव व निकालाची टक्केवारी
जगत जागृती विद्यामंदिर चाकूर -98.79%, जिल्हा परिषद कन्या शाळा चाकूर -96.00%,भाई किशनराव देशमुख माध्यमिक विद्यालय चाकूर -100%,जिल्हा परिषद मुलांची शाळा चाकूर -100%, हाकानिया उर्दू विद्यालय चाकूर -80.00%, इंदिरा पाटील माध्यमिक विद्यालय चाकूर -79.16%, , केशवराव पाटील विद्यालय बोथी -100%,कै. नरसिंगराव चव्हाण माध्यमिक विद्यालय नळेगाव -100 %, आल फारूक उर्दू माध्यमिक विद्यालय नळेगाव -100 %,जिल्हा परिषद शाळा नळेगाव -84.61%, भगतसिंह विद्यालय आष्टा -100%, शंकर विद्यालय आटोळा -95.55%,संजीवनी विद्यालय चापोली-92.73%, शिवाजी विद्यालय घरणी -95.75%, स्वामी विवेकानंद जानवळ -94.44%, व्यंकटेश विद्यालय जढाळा -96.15%,जनता विद्यालय महाळंग्रा -95.23%, स्वामी विवेकानंद विद्यालय चापोली 100%,महात्मा फुले विद्यालय कबन सांगवी 98.00%,शिवाजी विद्यालय रोहिणा -95.65%, शाहू विद्यालय शेळगाव 100%, डॉ. मधुसूदन बांगड विद्यालय आजासोंडा -96.34%, अनंत तुळजाराम नाईक विद्यालय नळेगाव- 100 %, सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय झरी -100%,गणेश विद्यालय शिवनखेड बु -94.23%, माधवराव पाटील विद्यालय महाळंगी -95.23%, संत गोविंद बाबा विद्यालय लातूर रोड -95.23%,बापू विद्यालय नागेश वाडी -98.03%, राजीव गांधी आनंदवाडी -95.45%,नेहरू विद्यालय नायगाव -100%, बापूसाहेब पाटील विद्यालय वडवळ नागनाथ १००%, विद्यानिकेतन विद्यालय वडवळ नागनाथ -100%, जिल्हा परिषद प्रशाला वडवळ नागनाथ -80.00% वीर हनुमान विद्यालय हिंपळनेर -93.75%, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विदयालय राचान्नावाडी – 100 % अशी माहिती वृतांत लेखन करेपर्यंत मिळाली आहे.
या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन चाकूर अहमदपूर तालुक्याचे आमदार बाबासाहेब पाटील, जगत जागृती शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नरेश पाटील, लोकायत शिक्षण संस्थेचे सचिव ॲड.पी. डी. कदम,चाकूरचे गटशिक्षणाधिकारी जयसिंह जगताप, जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी संजय आलमले यांच्यासह तालुक्यातील अनेक शिक्षणप्रेमीनी केले आहे.


