हैद्राबाद गॅझेटनुसार सकल बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी

चाकूर : 11 सप्टेंबर (मधुकर कांबळे )
सकल बंजारा समाजाला हैद्राबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमाती (एसटी)प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी चाकूर तालुक्यातील बंजारा समाजाच्यावतीने करण्यात आली आहे.
याबाबत तालुक्यातील सकल बंजारा समाजाच्यावतीने गुरुवार दि.11सप्टेंबर 2025 रोजी चाकूरचे तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्यानावे गोर बंजारा समाजास हैद्राबाद गॅझेटनूसार अनूसुचित जमाती (एस टी )प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र सरकारने हैद्राबाद गॅझेटच्या नोंदी आधारे मराठा समाजाला “कुणबी” प्रमाणपत्र देण्यासाठी नुकताच शासन आदेश काढला आहे.त्याचप्रमाणे गोर बंजारा समाजाचीही हैद्राबाद गॅझेट मध्ये नोंद आहे. बंजारा समाज आंध्रप्रदेश राज्यामध्ये एस टी प्रवर्गात तर कर्नाटक राज्यामध्ये एस सी प्रवर्गामध्ये आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने राज्यातील बंजारा समाजाला सरसकट एस टी प्रवर्गातून आरक्षण देऊन जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी शासन आदेश काढावा अशी मागणी करण्यात आली आहे.जर महाराष्ट्र सरकारने बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण दिले नाही तर या मागणीसाठी उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सदरील निवेदनावर विकास चव्हाण,संतोष जाधव, ॲड.परशुराम राठोड,पत्रकार सुनिल जाधव,शिवाजी जाधव,तानाजी जाधव,लहू राठोड,शुभम पवार,प्रकाश राठोड,सुनिल राठोड,वैजनाथ पवार,प्रकाश राठोड,व्यंकट राठोड,अतिश चव्हाण,लक्ष्मण पवार,लखन पवार,सुनिल चव्हाण,जीवन राठोड,रितेश चव्हाण,श्रीराम जाधव,प्रसाद आडे,विकास राठोड,आकाश राठोड,लक्ष्मण जाधव,अंबादास जाधव,लक्ष्मण चव्हाण,गणेश जाधव,प्रकाश राठोड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


